Gokul Election : गोकुळच्या एका जागेवरून शिवसेना-राष्ट्रवादीत घामासान : यड्रावकर गटाचा महायुतीत फुटबॉल

Gokul election 2026 seat sharing : राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा यड्रावकर गटाला द्यावी, अशीही सूचना आहे. प्रत्यक्षात ही जागा देण्यास राष्ट्रवादीचा विरोध तर आहेच शिवाय दहा जागा व एक स्वीकृतची जागा मिळावी, असा हसन मुश्रीफ यांचा आग्रह आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यावेळी यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते.
Gokul Election | NCP Seat Sharing | Yadravkar Row
Gokul Election | NCP Seat Sharing | Yadravkar RowSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News, 06 Oct : 'गोकुळ'च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला आणखी एक जागा हवी असल्याने या जागेवरून उमेदवार निश्चितीचा तिढा निर्माण झाला आहे. त्यात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पण याला राष्ट्रवादीतूनच अंतर्गत विरोध आहे.

शिवाय शिवसेनेतून देण्याला देखील विरोध आहे. दरम्यान, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉ. विनय कोरे परदेशात असल्याने आज महायुतीच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली नाही. डॉ. कोरे आज येणार असून, त्यानंतर ही बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीला नऊ, तर भाजप व शिवसेना शिंदे पक्षाला प्रत्येकी सात जागा देण्याचे ठरले आहे. उर्वरित दोन जागा 'जनसुराज्य'ला मिळाल्या आहेत.

त्याचवेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा यड्रावकर गटाला द्यावी, अशीही सूचना आहे. प्रत्यक्षात ही जागा देण्यास राष्ट्रवादीचा विरोध तर आहेच शिवाय दहा जागा व एक स्वीकृतची जागा मिळावी, असा राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांचा आग्रह आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यावेळी राज्यमंत्री असलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते.

Gokul Election | NCP Seat Sharing | Yadravkar Row
Gokul Politics : एका पत्रकामुळे गोकुळमधील महायुतीचे मतभेद अन् मनभेद चव्हाट्यावर : विद्यमानांचा पत्ता कट करण्यासाठी बैठका

त्या जोरावर यड्रावकर यांना शिवसेनेच्या कोट्यातील जागा द्यावी, अशी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाची मागणी आहे; पण 'गोकुळ'च्या राजकारणात यड्रावकर गटाने आपल्या गटाचे ठराव राष्ट्रवादीकडे आणि त्यातही मंत्री मुश्रीफ यांच्याकडे दिले आहेत, त्यामुळे यड्रावकर गटाला राष्ट्रवादीतूनच एक जागा द्यावी, अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. त्यातून हा तिढा निर्माण झाला आहे.

दुसरीकडे राखीव गटातील पाच जागांचे वाटपही स्थानिक पातळीवर होणार असल्याचे सांगितले जाते. भटक्या विमुक्त गटाची जागा भाजपला, तर महिला गटाच्या दोन्हीही जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून गेल्या निवडणुकीत 'जनसुराज्य'चे अमरसिंह पाटील विजयी झाल्याने ही जागा त्यांच्याकडेच राहील. अनुसूचित जाती प्रवर्गातील जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे.

Gokul Election | NCP Seat Sharing | Yadravkar Row
MPSC Protest Pune : MPSC आंदोलन पेटले अन् पोलीस ॲक्शन मोडमध्ये : 29 क्लासेससह 51 विद्यार्थ्यांना नोटिसा; गुन्हे दाखल होणार?

जागावाटपात अगोदरच कमी जागा मिळाल्या, त्यात एक जागा यड्रावकर गटाला द्यायची झाल्यास आपली एक जागा कमी होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत एक जागा कमी होता कामा नये, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी राज्य आणि स्थानिक शिवसेनेचे नेते उद्या (ता. ६) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. भाजपकडे १० इच्छुक आहेत.

त्यांच्या वाट्याला आलेल्या सात जागांवरील उमेदवार जवळपास निश्चित आहेत. त्यात मावळत्या सभागृहातील दोन संचालकांसह तीन माजी संचालकांचा समावेश आहे. उर्वरित पाचपैकी एक जागा आमदार शिवाजी पाटील गटाला, तर एक जागा स्वीकृतची मिळेल. खुल्या प्रवर्गातील एका जागेवर कोणाची वर्णी लागणार, याविषयी उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com