Satara News : काही वर्षांपूर्वी जिवलग मित्र दीपक गेला. आता त्याची मुलगीही रात्री अपघातात गेली. मित्राच्या कुटुंबावर झालेला हा आघात सर्व प्रसंगांशी निर्भिडपणे तोंड देणाऱ्या खासदार उदयनराजेंनाही तीव्र वेदना देऊन गेला. कास ररस्त्यावर काल रात्री झालेल्या अपघातात गायत्री आहेरराव हिचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर मनाला प्रचंड वेदना झाल्या. भूतकाळातील अनेक घटना वेगाने तरळून गेल्या, अशा शब्दात खासदार उदयनराजेंनी दु:ख व्यक्त केले.
सातारा शहराजवळ Satara असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात शुक्रवारी रात्री हा भीषण अपघात झाला. क्रेटा आणि होंडा सिटी कारची समोरासमोर धडक होवून चार ते पाचजण जखमी झाले, तर Satara Palika पालिका कर्मचारी गायत्री आहेरराव या 21 वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. गायत्रीचे वडील दीपक आहेरराव यांचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. आता हा दुःखाचा डोंगर आहेरराव कुटुंबीयांवर कोसळला आहे. यवतेश्वर घाटात झालेला अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला.
या दुर्घटनेत मृत पावलेली गायत्री आहेरराव ही दीड वर्षांपूर्वी सातारा नगरपालिकेत कामास होती. दुर्देवी बाब म्हणजे सातारा नगरपालिकेचे कर्मचारी असलेले तिचे वडील दीपक आहेरराव हे देखील काही वर्षांपूर्वी अपघातामध्ये मृत पावले होते. वडिलांनंतर लेकीवरही काळानं घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताबद्दल खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी दुख व्यक्त केलंय.
आमचे निकटवर्तीय मित्र कै. दीपक आहेरराव यांची सुकन्या गायत्री दीपक आहेरराव हिचा काल दुर्देवी अपघातात मृत्यू झाला. हे समजल्यानंतर मनाला प्रचंड वेदना झाल्या, अशा शब्दात उदयनराजेंनी दु:ख व्यक्त केलंय. भूतकाळातील अनेक घटना वेगाने तरळून गेल्या.
श्री आहेरराव परिवाराशी आमचा अत्यंत घनिष्ट ऋणानुबंध आहे. दीपक यांचंही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं होतं आणि आज परत हा दुःखाचा डोंगर आहेरराव कुटुंबीयांवर आला. वहिनी श्रीमती ज्योती आहेरराव यांनी अतिशय कष्टानं व जिद्दीनं सर्व अडचणींना सामोरे जाऊन मुलांची शिक्षण व सर्व गोष्टींची पूर्तता केली.
मात्र, आज त्यांच्यासाठी काय भावना व्यक्त कराव्यात हेच समजत नाही, आम्ही निशब्द आहोत. नुकतीच नगरपरिषदेच्या सेवेत गायत्री रुजू झाली होती, याचं समाधान होतं. परंतु, हे समाधान अल्पकालावधीचं ठरलं. तिच्या अचानक एक्झिटची सल मनात कायम टोचत राहील. आहेरराव कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असं उदयनराजेंनी म्हटलंय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.