Kolhapur election : पंचगंगा कारखाना निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; मुंबई न्यायालयाचा दिला मोठा निर्णय

Mumbai High Court Stays Panchganga Sugar Factory Election in Kolhapur : देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Kolhapur election
Kolhapur electionSarkarnama
Published on
Updated on

Panchganga Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र सत्ताधारी गटाकडून कारखान्याच्या अध्यक्ष पी. एम. पाटील आणि समर्थक बाबासाहेब भीमराव मगदूम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर या निवडणुकीला पुन्हा एकदा स्थगिती मिळाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आल्याच्या सूचना देण्यात आले आहेत. दरम्यान सत्ताधारी गटावर आक्षेप घेणाऱ्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या कन्या रजनीताई मगदूम यांना धक्का मिळाला आहे.

केंद्रीय सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेली बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करत निवडणूक पुन्हा एकदा लावण्यात आली होती. त्यानंतर सत्ताधारी गटाचे आणि कारखान्याचे अध्यक्ष पीएम पाटील आणि बाबासाहेब मगदूम यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Court) धाव घेऊन त्या संदर्भात न्याय मागितला होता. त्यावर न्यायालयाकडून सहा आठवड्यात केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Kolhapur election
Krishnaswamy Kasturirangan : इस्त्रो माजी प्रमुख, पद्मश्री, पद्मभूषण अन् पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित कृष्णस्वामी कस्तुरीरंगन...

तीन महिन्यापूर्वी इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सहकारी कारखानाची निवडणूक (Election) बिनविरोध झाली होती. या निवडी विरोधात रत्नाप्पा कुंभार यांच्या कन्या रजणीताई मगदूम यांनी केंद्रीय सहकार निवडणूक असोसिएशन कडे तक्रार केली होती.

Kolhapur election
IAS success story : पहिलीत असतानाच पितृछत्र हरपलं; अहोरात्र मेहनत करत रितेशने IAS पदाला घातली गवसणी

याची दखल घेत ही निवडणूक बरखास्त करत बिनविरोध करण्यात आलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याची नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय सहकार खात्याने दिले होते. नव्या आदेशानुसार कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम 29 एप्रिलला सुरू होणार असून, 11 मे रोजी मतदान होणार होते.

महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कार्यक्षेत्र असलेल्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी सामान्य उत्पादक सभासदांच्या 12, महिला 2, ब वर्ग व्यक्ती गट एक, ब वर्ग संस्था एक आणि मागासवर्गीय प्रवर्ग एक अशा एकूण 17 जागा आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com