Sawant Family Dispute : ‘माझ्या भाजप प्रवेशाला भावकी आडवी आली; मुख्यमंत्र्यांना सांगून प्रवेश रोखला’ : तानाजी सावंतांवर भावाचा गंभीर आरोप

Shivaji Sawant Allegation To Tanaji Sawant : झेडपी निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी सावंत यांनी भाजप प्रवेश रोखल्याचा आरोप बंधू तानाजी सावंतांवर केला. सावंत घराण्यातील अंतर्गत वाद सार्वजनिक झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Tanaji sawant-shivaji sawant
Tanaji sawant-shivaji sawantSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 January : शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी अनेकदा प्रयत्न करूनही त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होऊ शकलेला नाही, त्याचे गुपित खुद्द शिवाजी सावंतांनी फोडले आहे. ‘माझ्या भाजप प्रवेशाला भावकी आडवी आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी माझा भाजप प्रवेश रोखला आहे,’ असा घाणाघाती आरोप शिवाजी सावंत यांनी आपले बंधू माजी मांत्री तानाजी सावंत यांच्यावर केला आहे. ऐन झेडपी निवडणुकीच्या तोंडावर सावंत घराण्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेनेत डावलेले जात असल्यामुळे शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांनी जुलै २०२५ मध्ये संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरात भेट घेतली होती. तसेच, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघातील घरांच्या चाव्या प्रदान करण्यासाठी सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

मुंबईत जाऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. अनेकदा भेटूनही शिवाजी सावंतांचा भाजप प्रवेश होऊ शकलेला नाही, त्यामुळे सावंतांचा भाजप प्रवेश कुठे अडला आहे, असा सवाल उपस्थित होत होता. त्याचे उत्तर खुद्द शिवाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून दिले आहे.

शिवाजी सावंत म्हणाले, सत्तापक्षामध्ये असलं की काम करायला जिद्द निर्माण होते, त्यामुळे भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या निर्णयात भावकी आडवी आली. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना मला भाजपमध्ये घेऊ नका, असे सांगून माझा प्रवेश रोखला आहे. सावंत कुटुंबात आता वितुष्ट निर्माण झाले आहे.

Tanaji sawant-shivaji sawant
Ramdas Athawale RPI : युतीनं जागाच सोडल्या नाहीत, नाईलाजास्तव कार्यकर्ते भिडले; आठवलेंच्या 'रिपाइं'ची अन् आंबेडकरांच्या 'वंचित'ची मुंबईत जोरदार नाचक्की!

सावंत कुटुंबातील इतर कोणताही व्यक्ती मोठा होऊ नये, अशी तानाजी सावंतांची मानसिकता आहे. आमच्या सावंत कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आहे, अशी खंतही शिवाजी सावंतांनी बोलून दाखवली आहे. घरातील व्यक्तींनीच माझा भाजप रोखला गेला आहे, त्यामुळे आता माझ्यासमोर सर्वच पर्याय खुले आहेत, असेही सावंतांनी स्पष्ट केले.

Tanaji sawant-shivaji sawant
Solapur Mahapalika : आजोबा, काकानंतर नातू ठरणार सोलापूरचा नवा कारभारी; महापालिकेची सूत्रे पुन्हा ‘राधाश्री’तूनच हलणार

शिंदे-पाटलांच्या माध्यमातून पक्षप्रवेशासाठी प्रयत्न

माजी आमदार संजयमामा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या माध्यमातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात येत आहे. येत्या दाेन दिवसांत पक्ष आणि चिन्ह ठरेल, असेही शिवाजी सावंतांनी स्पष्ट केले. मागील निवडणुकीत माजी आमदार बबनराव शिंदे यांची प्रकृती पाहून मानेगाव गटातून रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्याची जाणीव रणजितसिंह शिंदेंनी ठेवावी, अशा कानपिचक्याही त्यांनी शिंदेंना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com