Telangana Election 2023 : तेलंगणा निवडणूक प्रचाराच्या रणांगणात 'नगरी नेता'; पक्षांतर्गत प्रस्थापितांना आव्हान

Telangana Politics : भारतीय जनता पक्षाने तेलंगणाची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे
Telangana Election 2023 :
Telangana Election 2023 :Sarkarnama
Published on
Updated on

Nagar Politics : भारतीय जनता पक्षाने तेलंगणाची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. तेलंगणा निवडणुकीत प्रभाव पाडण्यासाठी भाजपकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तेलंगणा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणांगणात 'नगरी नेता' उतरवला आहे.

माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या खांद्यावर तेलंगणा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा दिली आहे. आमदार शिंदे यांचे केंद्रीय पातळीवर वेगवेगळ्या कामातून नेहमीच वजन वाढवत आहे. आमदार शिंदेंचे हे वाढते वजन नगर भाजपमधील प्रस्थापित, आव्हानात्मक नजरेतून पाहत आहे.

Telangana Election 2023 :
Ajit Pawar News : 'महाराष्ट्रात वाटेल ती जमीन लिलाव करून मिळेल'; PM मोदींसोबतचा फोटो ट्विट करत काँग्रेसने अजितदादांना डिवचलं

माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांना तेलंगणा राज्यातील जगतीयाल जिल्ह्यातील मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. आमदार शिंदे यांनी तिथे कामदेखील सुरू केले आहे. कार्यशाळा घेतली आहे. निजामाबादचे खासदार अरविंद धर्मपुरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सत्यनारायण राव, विधानसभा निमंत्रक मदन मोहन, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावणी बोगा, जिल्हा सरचिटणीस रंगील सत्यनारायण या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नववे वंशज म्हणून आमदार शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. आमदार शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. पक्षांतर्गत केंद्रीय पातळीवर त्यांचे अलीकडच्या काळात महत्त्व वाढत आहे. यातून त्यांना वेगवेगळ्या राज्यात काम करण्याची संधी मिळते आहे. यापूर्वी त्यांच्याकडे गोवा, कर्नाटक राज्यातील निवडणुकांची जबाबदारी दिली गेली होती.

आमदार शिंदे यांचे केंद्रीय पातळीवर वाढणाऱ्या वर्चस्वाकडे नगर भाजपमधील प्रस्थापित आव्हानात्मक नजरेतून पाहू लागले आहेत. आमदार शिंदे यांनी पूर्वी नगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांना त्यांनी एकप्रकारे आव्हानच दिले होते. विधानसभा 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. यातूनच पक्षाच्या केंद्र पातळीवरून येत असलेल्या कामांतदेखील ते सक्रिय असतात. यातून त्यांचे पक्षात काम वाढत आहे. याची पावती आमदार शिंदे यांना मोठ्या आणि वेगळ्या स्वरूपात मिळेल, अशी चर्चा आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Telangana Election 2023 :
Rohit Pawar News: 'झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी युवा संघर्ष यात्रा'; रोहित पवारांचा निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com