Ajit Pawar News : 'महाराष्ट्रात वाटेल ती जमीन लिलाव करून मिळेल'; PM मोदींसोबतचा फोटो ट्विट करत काँग्रेसने अजितदादांना डिवचलं

Maharashtra Congress On Ajit Pawar : पुण्यातील येरवड्यातल्या भूखंडाच्या वादावरून उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चेत आहेत.
PM Modi Ajit Pawar
PM Modi Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी 'मॅडम कमिशनर' या पुस्तकातून विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केला होता. पुण्यातील येरवडा येथील पोलिसांचा भूखंड बिल्डरला हस्तांतरित करण्यास अजित पवारांनी सांगितले होते, असा आरोप बोरवणकर यांनी केला. यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले. यावरून राजकारण रंगले आहे. काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

PM Modi Ajit Pawar
Pawar Decline Borwankar's Allegations : मीरा बोरवणकरांचे 'ते' आरोप अजितदादांनी फेटाळले, म्हणाले...

माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चौकशीची मागणी केली. आता काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अजित पवारांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. काँग्रेसने एक फोटो ट्विट करत सोशल मीडियात स्पर्धा आयोजित केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हटलं काँग्रेसने ट्विटमध्ये?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमानतळावर स्वागत करतानाचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही दिसत आहेत. फोटोत पंतप्रधान मोदी हे अजित पवार यांच्यासोबत संवाद साधताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन द्या आणि आकर्षक बक्षीस ....: महाराष्ट्रात वाटेल ती जमीन लिलाव करून मिळेल, असं म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी देश विकायला काढला आहे, अशी टीका काँग्रेसकडून सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर होत असते. आता मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांवरून काँग्रेसने अजित पवार यांना डिवचलं आहे. पुण्यातील येरवड्यातल्या भूखंडाच्या वादावरून महाराष्ट्रातील वाटेल ती जमीन लिलाव करून मिळेल, असं म्हणत काँग्रेसने अजित पवार यांना टोला लगावला आहे.

PM Modi Ajit Pawar
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंना थेट ऑफर!; भाजप आमदाराच्या विधानाने राज्यभर चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com