Solapur Dcc Bank Chairman : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी ‘ही’ तीन नावे चर्चेत; पण प्रशांत परिचारकांचे पारडे जड

Prashant Paricharak -Sachin Kalyanshetti-Rajendra Raut : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. अध्यक्षपदासाठी प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी आणि राजेंद्र राऊत यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
Prashant Paricharak-Sachin Kalyanshetti-Rajendra Raut
Prashant Paricharak-Sachin Kalyanshetti-Rajendra RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 29 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे, त्यामुळे बॅंकेचे अध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला आहे. तब्बल 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय असलेल्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव आघाडीवर आहे. यासोबतच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत ही दोन नावेही चर्चेत आहेत. मात्र, परिचारक यांच्या नावाला भाजप हायकमांडकडून पसंती मिळण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १९ जागांपैकी १० जागांवर भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर उर्वरीत ९ जागांसाठी निवडणूक झाली होती, त्यातही माळशिरस सोसायटी मतदारसंघाची एक जागा सोडता आठही जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची सत्ता जिल्हा बॅंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आली आहे.

जिल्हा बॅंकेच्या १९ जागांपैकी केवळ माजी आमदार प्रशांत परिचारक हेच सहकार क्षेत्रातील अनुभवी आहेत. परिचारक यांनीच जिल्हा बॅंकेत यापूर्वी काम केले आहे. उर्वरीत १८ संचालकांपैकी कल्याणशेट्टी, राऊत यांना विधानसभा कामकाजाचा अनुभव आहे. मात्र, जिल्हा सहकारी बॅंकेच्या कामाचा अनुभव त्यांच्याकडे नाही, त्यामुळे परिचारक यांचे पारडे जड ठरते.

दरम्यान, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपसाठी अनेकदा माघार घेतली आहे. २०२१ मध्ये पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारीसाठी परिचारकांची दावेदारी होती. मात्र, जिंकण्याच्या उद्देशाने समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली.

त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत परिचारकांनी उमेदवारी करावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता. मात्र, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी पंढरपुरात येऊन परिचारकांची मनधरणी केली होती. त्यावेळी त्यांनी परिचारकांना आमदारकीचा शब्द दिल्याचे सांगितले जाते. पण त्यानंतर झालेल्या राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारकी आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातूनही डावलण्यात आले होते. त्यामुळे परिचारक समर्थकांमध्ये नाराजी होती.

Prashant Paricharak-Sachin Kalyanshetti-Rajendra Raut
Uddhav Thackeray On Delimitation : डिलिमिटेशन समितीसाठी उद्धव ठाकरेंनी सुचविले या निवृत्त न्यायमूर्तींचे नाव...

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला होता. मात्र, विभागीय सहनिबंधकांच्या सुनावणीत त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला. त्यानंतर त्यांची जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली. आता अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. कारण बार्शीकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.

दुसरीकडे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ते जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद स्वतःकडे घेण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे परिचारक यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा समतोल अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या वाटपावेळी राखला जाण्याची शक्यता आहे. तसेच अध्यक्षपद वर्षाचे, दोन-दोन आणि एक वर्षाचे की अडीच वर्षांचे? याबद्दलही उत्सुकता आहे.

Prashant Paricharak-Sachin Kalyanshetti-Rajendra Raut
Satara Politic's : शंभूराज देसाईंनी कोरेगावात डाव टाकला; आमदार महेश शिंदे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश, राजाभाऊ बर्गेंना पाठबळ...

संचालक मंडळाची पहिली बैठक शनिवारी होणार

सोलापूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी येत्या शनिवारी (ता. ५ डिसेंबर) सकाळी ११ वाजता बँकेच्या सभागृहात नूतन संचालक मंडळाची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरणार आहेत. बैठकीचे अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार हे काम पाहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories