Solapur Politics News : उजनीच्या पाण्यावरून राजकारण पेटले, करमाळ्याच्या माजी आमदारांनी केली विद्यमान आमदारांवर चिखलफेक

Narayan Aba Patil Vs SanjayMama Shinde : उजनीच्या पाण्यावरून नारायण आबा पाटील यांनी संजयमामा शिंदे यांच्यावर टीका केल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
narayan aba patil sanjay mama shinde
narayan aba patil sanjay mama shindesarkarnama

Solapur News, 21 May : उजनी धरणाच्या ( Ujani Dam ) पाणीपातळीत दररोज कमालीची घट होत आहे. उजनी धरणातील पाणीसाठा सध्या मायनस 57 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या 41 विविध योजनांपैकी सर्वच योजना बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सोलापूर, पुणे, धाराशिव आणि नगर या चार जिल्ह्यांची भविष्यातील 'धक-धक' वाढली आहे. पण, आमदारांचे लाड पुरविण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यात येते, असं म्हणत करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

उजनी धरणाकडे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून पाहिलं जातं. 110 टक्के भरूनही उन्हाळ्यात पाण्यासाठी जिल्ह्यात नागरिकांना वणवण फिरावं लागतं. नियोजनाचा अभाव आणि राजकीय नेत्यांनी पाण्याची पळवापळवी केल्यानं दरवर्षी उजनी उन्हाळ्यात मायनसमध्ये जाते, असा आरोप सातत्यानं केला जातो. गेल्यावर्षी सोलापूर, पुणे जिल्हासह उजनी क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे उजनी धरण 66 टक्के भरलं होतं. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून उन्हाची तीव्रताही वाढली आहे. उजनीवर अवलंबून असलेल्या अनेक योजना आणि उद्योगांना पाणी बंद करण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यातच नारायण आबा पाटील ( Narayan Aba Patil ) यांनी संजयमामा शिंदेंना ( Sanjay Mama Shinde ) लक्ष्य केलं आहे. "उजनीच्या पाण्याकडे पाहणारा कुणीच नेता नाही. वास्तविक विद्यमान आमदार ( संजयमामा शिंदे ) यांनी उजनीकडेला असलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे दोनवेळा गरज नसताना उजनीतून पाणी सोडण्यात आलं. काही आमदारांचे लाड पुरविण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यात येते. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली, तर उजनीत पाणी राहणार नाही. त्यामुळे शासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन उजनीनं सकारात्मक दृष्टीनं पाहण्याची गरज आहे."

narayan aba patil sanjay mama shinde
Karmala Politics : करमाळ्यातील पक्षांतराचा फायदा मोहिते पाटलांना होणार की निंबाळकरांना?

"उजनीतील वाळूमिश्रीत गाळ काढण्यात आला पाहिजे. एक ते दोन वर्षात हा गाळ निघेल, असं वाटत नाही. त्यामुळे दोन ते तीन वर्षा या गोष्टी लागले, तरी चालतील. सोळा ते सतरा 'टीएमसी' वाळूमिश्रीत गाळ आहे. तो काढणं गरजेचं आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढेल आणि भविष्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल," अशी मागणी नारायण आबा पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

narayan aba patil sanjay mama shinde
Madha Lok Sabha Victory : माढ्यातून मोहिते पाटलांच्या विजयावर चक्क 11 बुलेटची पैज!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com