Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यात वादाची ठिणगी! प्रशासनाच्या तालावर नाचणं साधूंना भोवलं : समन्वयक पदावरून हटवलं

Digambar Akhada, Mahant Bhakticharandas: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत आखाड्यांमध्ये मतभेद उघड झाले. दिगंबर आखाड्याने महंत राम किशोरदास शास्त्री यांना प्रशासनाशी संवादाचे अधिकार देत महंत भक्तीचरणदास यांच्या भूमिकेवर मर्यादा आणल्या.
Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh Mela Sarkarnama
Published on
Updated on

Nashik: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुरू असतानाच त्यात वादाची ठिणगी पडली आहे. प्रशासनाच्या तालावर नाचणाऱ्या साधूंना दिगंबर आखाड्याने चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि साधू यांच्यातील समन्वयाला नवे वळण मिळणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात बहुतांशी निर्णय वरिष्ठ पातळीवर होत आहेत. त्यात स्थानिक साधू आणि आखाड्यांना महत्त्व दिले जात नसल्याची तक्रार आहे. मागील कुंभमेळ्यात आखाडा परिषदेने महंत भक्तीचरणदास यांना समन्वयक म्हणून नियुक्त केले होते. आखाडे आणि प्रशासन यांच्या सोयीसाठी यंदाही काही आखाड्यांनी तीच पद्धत सुरू ठेवली होती. महंत भक्तीचरणदास हे आखाड्यांच्या वतीने प्रशासनाशी संवाद साधत होते.

Nashik Kumbh Mela
Maharashtra Politics Live Update : 'ज्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला, त्यांच्यावर कारवाई केली जाणारच..';मंत्री गिरीश महाजन यांचे संकेत

आखाड्यांच्या सुविधा आणि कुंभमेळ्यातील व्यवस्था याविषयी विश्वासात घेतले जात नसल्याचे आखाड्यांचे म्हणणे होते. विशेषत: त्र्यंबकेश्वर येथील षड दर्शन आखाडा परिषद याबाबत विशेष आग्रही होती. नुकत्याच झालेल्या ध्वजस्तंभ शिलान्यास कार्यक्रमाच्या निमित्ताने वैष्णव आखाड्याचे काही पदाधिकारी नाशिकमध्ये एकत्र आले होते. त्यावेळी महंत भक्ती चरणदास हे आखाड्यांच्या वतीने परस्पर प्रशासनाशी संवाद साधून निर्णय घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत दिगंबर आखाड्याच्या काही प्रतिनिधींनी तक्रार केली.

त्यानंतर नाराज असलेल्या आखाड्याच्या प्रतिनिधींनी गंभीर दखल घेत महत्त्वाचे निर्णय घेतले. दिगंबर आखाड्याने नाशिकचे महंत राम किशोरदास शास्त्री यांना प्रशासनाशी चर्चा करण्याचे सर्व अधिकार दिले. प्रशासनाच्या बैठकीमध्ये राम किशोरदास शास्त्री यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही दिगंबर आखाड्याचे निर्णय घेण्याचा अधिकार नाही असे लिखित स्वरूपात प्रशासनाला कळविण्यात आले.

Nashik Kumbh Mela
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

दिगंबर आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत वैष्णवदास आणि उपाध्यक्ष महंत माधवदास यांनी याबाबत लिखित पत्र दिले. महंत राम किशोरदास शास्त्री यांच्या संमतीशिवाय निर्णय झाल्यास त्याची कोणतीही जबाबदारी राहणार नाही असे प्रशासनाला कळविण्यात आले. त्यामुळे यापूर्वी नियुक्त केलेले महंत भक्तीचरणदास यांना आवर घालण्याचे काम दिगंबर आघाड्याने केल्याचे स्पष्ट झाले.

नुकत्याच झालेल्या नाशिक दौऱ्यात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष महंत ज्ञानदास महाराज, त्यांचे उत्तराधिकारी महंत संजयदास, निर्मोही अनी आखाड्याचे प्रमुख महंत राजेंद्रदास यावेळी उपस्थित होते. कुंभमेळा जवळ येत असताना आखाड्यांचे अनेक प्रश्न नव्या स्वरूपात मांडले जाण्याची शक्यता आहे. साधूंमधील मतभेदाचे हे महत्त्वाचे कारण ठरू शकते. यानिमित्ताने प्रशासनाच्या तालावर नाचणाऱ्या महंत भक्तीचरणदास यांना निरस्त करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचे महत्त्व संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

Nashik Kumbh Mela
Shivaji Kalge-Amit Deshmukh : लातूरच्या रखडलेल्या विकासकामांना बुस्ट मिळणार का? काळगे दिल्लीत तर देशमुख विधीमंडळात आवाज उठवणार!

कुंभमेळ्यात साधूग्राम उभारणी आणि शाही स्नानासह विविध सुविधांमध्ये आखाड्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. शासनाला आखाड्यांच्या मर्जीने ती कामे करावी लागतात. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आखाड्यांमधील साधूंच्या मतभेदाचे दर्शन या निमित्ताने घडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com