भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी : जावयांमुळे चार सासरे अडचणीत !

सक्त वसुली संचलनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि एनसीबीने गेल्या सहा महिन्यात तीन सासऱ्यांच्या जावयांवर कारवाई केली आहे.
BJP Vs NCP
BJP Vs NCPSarkarnama
Published on
Updated on

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यात भारतीय जनता पार्टी विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा सामना रंगला असून वेगवेगळ्या आरोपांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चार बड्या नेत्यांचे जावई तपास यंत्रणांच्या कारवाईला सामोरे जात आहेत.जावयांवरील या या कारवायांमुळे सत्तेत असलेले सासरे अडचणीत येत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

सक्त वसुली संचलनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि एनसीबीने गेल्या सहा महिन्यात तीन सासऱ्यांच्या जावयांवर कारवाई केली आहे. यातील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रगप्रकरणी अटक झाली आहे.माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना ‘एमआयडीसी’ जमीन घोटाळ्यात अटक झाली आहे.

BJP Vs NCP
‘एमपीएससी’चा सुधारीत निकाल जाहीर : मानसी पाटील मुलींमध्ये राज्यात पहिल्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना शंभर कोटींच्या घोटाळ्यात कारवाई झाली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांनी ब्रिक्स इंडिया या कंपनीच्या माध्यमातून गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना चालविण्यास घेतला होता.यात शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी मंगोली यांच्यावर कारवाई झाली नसली तरी या आरोपांमुळे मुश्रीफ आणखी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

BJP Vs NCP
केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी

सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

सोमय्या यांच्या या आरोपानंतर मुश्रीफ यांनी दीडशे कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.या प्रकरणावरून सोमय्या विरूद्ध मुश्रीफ वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. वरील प्रकरणांत राष्ट्रवादीची पुरती बदनामी होत असताना आता सोमय्या यांनी मुश्रीफांच्या जावयावर आरोप करून आणखी खळबळ उडवून दिली आहे.

कॉंग्रेसचे दोन मंत्री अडचणीत येणार ?

गेल्या सहा महिन्यात शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावे विविध घोटाळ्यात पुढे येत होती. मात्र, यापुढच्या काळात कॉंग्रेसच्या दोन मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितल्याने ते दोन मंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे.कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादीतील आणखी काही जणांसह जरंडेश्‍वर कारखान्याच्या निमित्ताने उमपुख्यमंत्री अजित पवार यांनाही टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com