Solapur Election News: एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा, तिकडे सोलापुरात अजितदादांचा शरद पवारांनाच मोठा धक्का

NCP Politics : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना,अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपनं शिवसेनेसोबतच्या युतीची घोषणा केली आहे. तर अजित पवारांनीही सोलापूर महापालिकेसाठी ताकद पणाला लावली आहे.
 Ajit pawar ncp Solapur .jpg
Ajit pawar ncp Solapur .jpgSarkarnama
Published on
Updated on

Solapur News: सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना,अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपनं शिवसेनेसोबतच्या युतीची घोषणा केली आहे. तर अजित पवारांनीही सोलापूर महापालिकेसाठी ताकद पणाला लावली आहे. महायुतीतील भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी (NCP) या तीनही पक्षांकडून विरोधी पक्षातील नेतेमंडळींना आपल्या पक्षात घेऊन एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला लागलेली गळती थांबतानाच दिसत नाही.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात शनिवारी(ता.27) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्याची चर्चा सुरू असतानाच अजितदादांनी दोन माजी महापौरांना फोडत शरद पवारांसह महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेलाही तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 2 माजी महापौरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी महापौर यू एन बेरिया आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांनी शनिवारी घड्याळ हाती घेतलं आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश पार पडले. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन माजी महापौरांनीच अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानं शरद पवारांसाठी (Sharad Pawar) हा मोठा धक्का मानला जात आहे.

 Ajit pawar ncp Solapur .jpg
Pune BJP News : भाजपचा पुण्यात मोठा डाव, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा मुलगाच फोडला; प्रशांत जगतापांविरोधातला 'चेहरा' ठरला?

तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे आणि क्रांती तालीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सपाटे यांना फोडलं आहे. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि अमर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सपाटे यांनी शुक्रवारी (ता.26)शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे सपाटे हे शिवसेनेकडून महापालिकेची निवडणूक लढविणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांचा पुतण्या ज्ञानेश्वर सपाटे यांनी पक्षाच्या शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या कार्यालयासमोर उपोषण केलं होतं. मात्र,त्यांनी हे उपोषणाची निवडलेली वेळ आणि त्यांच्या पुतण्याने साथ सोडणे,याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 Ajit pawar ncp Solapur .jpg
Prashant Jagtap News: काँग्रेसमध्ये पाऊल ठेवल्यानंतर 24 तासांच्या आतच प्रशांत जगतापांचं राष्ट्रवादी अन् शरद पवारांबाबत मोठं विधान

सोलापूर महानगरपालिकेसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजप नेते व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर 44 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हा प्रस्तावासोबतच शिवसेनेनं प्रभाग 6 आणि 7 मधील सर्व जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशी मागणीही भाजपकडे केली आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावावर मंत्री जयकुमार गोरे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com