Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील जिल्ह्यातील नेत्यांमध्ये मोठी स्पर्धा लागली होती. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि भाजपकडून इच्छgक असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड हे होळीच्या निमित्ताने एकत्र आले होते. तेव्हा खैरे यांनी कराडांना चिमटा काढत डाॅक्टर तुमच्या तिकिटाचे फायनल झाले का? अशी विचारणा केली होती.
तेव्हा कराड यांनी खैरेंना उलट सवाल करत आधी तुमच्या तिकिटाचे काय हे सांगा? म्हणत फिरकी घेतली होती. अखेर काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सतरा मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. त्यात छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना सहाव्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. खैरेंचं तिकीट आलंय, आता कराडांचे काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये संभाजीनगरच्या जागेवरून संघर्ष सुरू आहे. भाजपने आपल्या पंचवीस उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली, पण त्यात संभाजीनगरचा समावेश नव्हता. ही जागा कुणाची याचा फैसला अजूनही झालेला नाही. शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांनी संभाजीनगरवर दावा सांगितला असून, दोघेही माघार घ्यायला तयार नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी संभाजीनगरच्या जागेवर तडजोड न करण्याची भूमिका घेत इच्छुकांची नावे भाजप नेत्यांकडे सोपवली आहे, तर दुसरीकडे गेल्या दीड वर्षापासून लोकसभेची तयारी करणाऱ्या कराडांच्या मुंबई आणि दिल्लीत उमेदवारीसाठी भेटीगाठी सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संभाजीनगर येथील जाहीर सभेनंतर ही जागा भाजपच लढवणार, असे ठामपणे सांगितले जाते.
शिवसेना शिंदे यांच्यासोबत असलेल्या विद्यमान खासदारांनाच त्या- त्या मदारसंघात उमेदवारी दिली जाईल, असा फाॅर्म्युला ठरल्याचे सांगितले जाते. तो ग्राह्य धरला तर गेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरात शिवसेनेचा पराभव झाला होता. हाच मुद्दा रेटत भाजपने या मतदारसंघावरचा आपला दावा कायम ठेवला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संभाजीनगरसह राज्यातील अनेक मतदारसंघांबद्दल महायुतीच्या तीनही घटक पक्षांमध्ये वाद आहेत. त्यामुळे संभाजीनगरसह राज्यातील भाजपने जाहीर केलेले मतदारसंघ वगळता इतर ठिकाणचे उमेदवार कधी जाहीर होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. संभाजीनगरची जागा भाजपनेच लढवावी, अशी जनतेची इच्छा असल्याचा दावा कराड यांनी केला आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.