Sanagli News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले असतानाच कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये रोहित पाटील व माजी खासदार संजयकाका पाटलांच्या कार्यकर्त्यांत चांगलीच जुंपली आहे. या ठिकाणच्या नगरपंचायत निवडणुकीवरून माजी खासदार संजयकाका पाटील व आमदार सुमनताई पाटील यांच्या कार्यकर्त्यातील वाद चांगलाच रंगला आहे. त्या वादात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
कवठे महांकाळमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यामध्ये झालेल्या वादानंतर आता अचानक राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी एक प्रतिज्ञापत्र लिहून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली. प्रतिज्ञापत्रात अय्याज मुल्ला यांनी गैरसमजुतीमधून आणि गोंधळलेल्या परिस्थितीत विरोधात तक्रार दिल्याचे म्हटले आहे. (Sanjaykaka Patil News)
त्यासोबतच माजी खासदार संजयकाका पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळ यांनी देखील प्रतिज्ञापत्रातून तक्रार मागे घेतली आहे. कवठे महांकाळ येथे झालेल्या घटनेचा तपशील स्वत: अय्याज मुल्ला यांनी सांगितलेला आहे. शनिवारी त्यांनी केस मागे घेतली आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं आहे की, संजकाकांचा कोणताही संबंध नाही. माझा गैरसमज झाला होता.
त्यासोबतच मुल्ला यांनी या प्रकरणात रोहित पाटील नौटंकी करत आहेत. रोहित पाटील सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आता ते तोंडावर पडले आहेत. शनिवारी मोर्चासाठी गावागावात निरोप दिले होते. त्यामुळे अत्यल्प नागरिक हजर होते. मी बाहेरगावी आलेलो आहे, दोन दिवसांमध्ये मी त्यांना उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजयकाका पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सभा घेऊन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील यांच्यासह तासगाव-कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.