Sharad Pawar On CM Shinde : कृषिमंत्री असताना कांद्यावर 40 टक्के निर्यात कर कधी लावला नाही; पवारांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार

Sharad Pawar News: शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरात पहिलीच सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत बोलताना पवारांनी देशातील अनेक प्रश्नावर भाष्य करत कांद्याच्या मुद्यावरून सरकारला घेरलं. कृषिमंत्री असताना कांद्यावर 40 टक्के निर्यात कर कधी लावला नाही, असा पलटवार करत शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला.

"सध्या राज्यात आणि देशात काय परिस्थिती आहे. कांदा हा जगात पाठवला पाहिजे, मात्र, मोदी सरकारने 40 टक्के कर कांद्यावर लावला आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी काय केले, पण त्यांना मी सांगतो, की, मी कधीही कांद्यावर 40 टक्के कर लावला नाही. मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी होतो", असे म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले.

Sharad Pawar
Shankarrao Gadakh News : ''...तर केंद्र आणि राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार !''; ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

"गुरुवारी संध्याकाळी चांद्रयान-३ चंद्रावर उतरणार होतं, म्हणून सर्वजण तिकडे डोळे लावून बसले होते. हे ऐतिहासिक काम आपल्या देशातील वैज्ञानिकांनी करुन दाखवले. या संपूर्ण कामामध्ये महत्वाची भूमिका 'इस्त्रो'ने केली. याच 'इस्त्रो'च्या स्थापनेत जवाहरलाल नेहरू यांची महत्वाची भूमिका होती. त्यानंतर 'इस्त्रो'साठी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, अब्दुल कलाम यांचेही महत्वाचे योगदान हेते", असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
Jitendra Awhad In Kolhapur : गद्दार सापांना पायताणाने चेचा ! जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

पुढे बोलताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय मोदी सरकारने केला असल्याचे सांगून आता सप्टेंबर नंतर साखरेंवरही निर्यात बंदी लागू शकते, असे सूचक विधानही त्यांनी केले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com