Jayant Patil : 'आपली माणसं आपलीच असतात, कधी गट सोडायचा नाही', जयंत पाटलांनी पक्ष बदलण्यावर थेटच सांगितलं

Jayant Patil Clarifies Political Stand Amid BJP Entry and NCP Merger Talks : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर जयंत पाटील यांनी जाहीर सभेत भूमिका स्पष्ट करत निष्ठा बदलली असती तर अनेक संधी मिळाल्या असत्या, असे म्हटले आहे.
Jayant Patil
Jayant Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News : गेल्या वर्ष ते दीड वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच त्यांच्या काही राजकीय घटनांतून वेगवेगळे संदर्भ देत त्यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याच्या कथित गोष्टी सांगितल्या जात आहेत.

मात्र, आता स्वतः जयंत पाटील यांनीच आपल्या भाजप प्रवेशावर आणि पक्ष बदलण्याच्या भूमिकेवर थेट स्पष्टीकरण देत राजकीय भूमिकेवर बोट ठेवले आहे. मागच्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांच्या भेटीगाठीने जयंत पाटील भाजपसोबत जाणार, अशी चर्चा रंगली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचाही दावा वारंवार होत असल्याने जयंत पाटील यांनी जाहीर सभेत मोठा खुलासा केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या एका कार्यक्रमात आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ‘निष्ठा बदलली असती तर आम्हालाही अनेक संधी उपलब्ध झाल्या असत्या. दिलीपतात्यांसारखी अविचल निष्ठा असणारे नेते राजकारणात दुर्मीळ झाले आहेत,’ असे मत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

Jayant Patil
Jayant Patil : PM मोदींचे स्वागत अन् CM फडणवीसांसोबतच्या प्रवासाचे राजकीय अर्थ : जयंत पाटलांनी एकाच वेळी सगळे संशय फेटाळले

‘मला पद मिळेल, न मिळेल, त्यात काय आता लगेच. पण गट सोडायचा नसतो. कारण ती माणसं नवीन आहेत. पण आपली माणसं आपलीच. आपल्या बरोबर असतात, यालाच राजकारणात महत्त्व द्यायचे असते. आणि निष्ठा महत्त्वाची आहे. राजकारण फार महत्त्वाचे असते. राजकारण हे निष्ठेने, तत्त्वाने होण्याचा काळ मागच्या १० वर्षांत संपला आहे.

पण आता असे कधीच होणार नाही, असे समजू नका. या सगळ्या परिस्थितीवर दिवस जात असतात, हाच त्यांचा पर्याय आहे. निष्ठा फार महत्त्वाची आहे, त्याला रिव्हॅल्यू आहे. निष्ठा बुडल्यासारखी वाटते. पण पूर येऊन गेल्यावर त्या निष्ठेकडेच लोक बघत असतात. आपल्याला सगळ्यांसारखं व्हायचं असेल तर उद्या सकाळीच. आम्ही १० आमदार, ८ खासदार आहोत. काही सस्पेंड आहे का नाही,’ असेही जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil
Jayant Patil : भाजपचे सलग 5 हल्ले... जयंत पाटलांनी तीन डाव उलटवले, चौथ्या चालीकडे सांगलीचं लक्ष

जयंत पाटील म्हणाले, ‘‘माझ्या राजकीय जीवनात दिलीपतात्यांनी सर्वांत पुढे होत पाठराखण केली. आजपर्यंत राजारामबापूंचे निष्ठावंत म्हणून ते ठामपणे उभे आहेत. ४० ते ४५ वर्षांच्या राजकीय प्रवासात अनेक चांगले, वाईट, कटू प्रसंग अनुभवले. प्रत्येक लढाईत दिलीपतात्यांनी संघर्ष करण्याचे काम केले. समोरचा कितीही मोठा असला तरी विचार न करता अंगावर घेण्याचे धाडस दाखवले. राजारामबापूंच्या नेतृत्वातील संघर्षाच्या काळातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. दिलीपतात्या आहेत, म्हटल्यावर काळजी करायची गरज नाही, असे वाटत राहिले. म्हणूनच निष्ठेला मोठे महत्त्व आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com