Flight Politic : PM मोदींचे स्वागत अन् CM फडणवीसांसोबतच्या प्रवासाचे राजकीय अर्थ : जयंत पाटलांनी एकाच वेळी सगळे संशय फेटाळले

Jayant Patil Denies Political Talks With Devendra Fadnavis : एकीकडे दिल्लीत राष्ट्रवादी एनडिएसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची राज्यात जोरजार चर्चा सुरू असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता.
flight journey Politic; Devendra Fadnavis and Jayant Patil
flight journey Politic; Devendra Fadnavis and Jayant Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास झाला म्हणून त्याला राजकीय चर्चेचा रंग देणे योग्य नाही. प्रवासात भेटल्यावर राजकीय चर्चा कशी होऊ शकते? आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केले. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलींच्या विवाहाच्या स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केल्याचाही राजकीय अर्थ काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार जयंत पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधातील मोर्चाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या विविध राजकीय प्रश्नांना पाटील यांनी उत्तरे दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असल्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, ‘‘मी ३८ वर्षे विधानसभेत आहे. त्यातील २५ ते ३० वर्षे एकत्रितपणे काम केले आहे. त्यामुळे ओळख आणि संबंध असणारच. मात्र, ते राजकीय संबंध असू शकत नाहीत. माझे एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांशी संबंध आहेत.’’

flight journey Politic; Devendra Fadnavis and Jayant Patil
Jayant Patil : भाजपचे सलग 5 हल्ले... जयंत पाटलांनी तीन डाव उलटवले, चौथ्या चालीकडे सांगलीचं लक्ष

सुप्रिया सुळे यांच्या मुलींच्या विवाहाच्या स्वागत समारंभात पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केल्याबाबत पाटील म्हणाले, ‘‘पवार-सुळे कुटुंबाचा तो कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यावेळी केवळ पंतप्रधान मोदीच नव्हे, तर अमित शहा, राहुल गांधी यांच्यासह कार्यक्रमाला येणाऱ्या सर्वांचे मी स्वागत केले. त्याचा राजकीय अर्थ काढणे गैर आहे.’’

flight journey Politic; Devendra Fadnavis and Jayant Patil
Gen-Z Protest Jayant Patil : 'Gen-Z' आंदोलनाच्या मागण्या रास्त; झाले-गेले विसरा, त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या; जयंत पाटलांच्या सत्ताधारी-विरोधकांना कोपरखळ्या

शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठा लढा उभारणार :

शक्तिपीठ महामार्गाबाबत आंदोलन करण्याचा इशारा देत जिल्ह्यात मोठा लढा उभारणार असल्याचे जाहीर केले. लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा मोर्चा काढण्यात येत आहे. आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील या मोर्चात सहभागी होतील. शेतकऱ्यांनी सुपीक बनवलेल्या आणि मुबलक पाणी शेतीसाठी उपलब्ध असलेल्या जमिनी घेणे टाळले पाहिजे. शक्तिपीठ महामार्ग उभारल्यावर चीनच्या भीतीप्रमाणे भिंत उभी राहील, असे सांगत तालुकानिहाय बाधित आकडेवारी जाहीर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com