Mohol Constituency : मोहोळमध्ये पवारांच्या पक्षात बंडखोरी अटळ; क्षीरसागर लढण्यावर ठाम, गोविंद बागेत न जाण्याचे कारणही सांगितले

Sanjay Kshirsagar News : मोहोळ तालुक्यातील जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे मोहोळ मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांत सुरू असलेला लपंडाव या वेळी हाणून पाडल्याशिवाय जनता राहणार नाही.
Sanjay Kshirsagar
Sanjay Kshirsagar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 November : उमेदवार देणं हा पक्षाचा अधिकार असतो. पण, एखाद्या महिलेली मिळालेली उमेदवारी कापण्यासाठी आपण गोविंद बागेत जावं, यात मला पुरुषार्थ वाटला नाही, त्यामुळे मी मोहोळ तालुक्यातील शिष्टमंडळासोबत बारामतीत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गोविंद बागेत गेलो नाही, असे स्पष्टीकरण संजय क्षीरसागर यांनी दिले. तसेच, या निवडणुकीत सर्वच पक्षातून मला अदृश्यपणे ताकद मिळणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

मोहोळ मतदारसंघात (Mohol Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संजय क्षीरसागर हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र, पक्षाकडून शिवसेनेतून आयत्यावेळी आलेले राजू खरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमदेवारी जाहीर झाली होती. मात्र मोहोळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांनी भेट घेऊन कदम यांची उमेदवारी कापून ती खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावर संजय क्षीरसागर बोलत होते.

संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) म्हणाले, मोहोळ तालुक्यातील जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे मोहोळ मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांत सुरू असलेला लपंडाव या वेळी हाणून पाडल्याशिवाय जनता राहणार नाही.

Sanjay Kshirsagar
Jarange Factor : धसका कायम...जरांगेंच्या भेटीसाठी सोलापुरातील पाच उमेदवारांची अंतरवाली सराटीची वारी!

उमेदवारीसाठी माझी कोणी शिफारस केली असेल किंवा नसेल त्याबाबत माझा कोणावरही राग नाही. जे लोक मला यापुढेही मदत करणार आहेत, त्यांचा मी आभारी आहे. मोहोळ तालुक्यतील परिवर्तनसाठी मला निवडणूक लढवायाची आहे, त्यामुळे तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा मला विश्वास आहे.

मी गेली २५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षात काम केल्यामुळे बूथ यंत्रणा आणि नियोजन कसं असलं पाहिजे, याचा माझा पूर्ण अभ्यास आहे. मी पाच हजार कार्यकर्त्यांची यादी, त्यांच्या फोन नंबरसह पक्षाकडे दिलेली आहे. त्यामुळे निवडणुकीत मला कुठंही अडचण येणार नाही. मला सर्वच पक्षांची मदत मला अदृश्यपणे मिळणार आहे, असा दावाही क्षीरसागर यांनी केला.

Sanjay Kshirsagar
Shirala Constituency : फडणवीसांची यशस्वी शिष्टाई; सम्राट महाडिकांची माघार, देशमुखांना पाठिंबा जाहीर

एका महिलेला दिलेली उमेदवारी रद्द करावी, असं मला वाटलं नाही, त्यामुळेच मी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीला गेलो नाही, हा माझा विचार आहे. कदाचित तो बरोबर असेल अथवा चुकीचा असेल. मी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय हा आमच्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा निर्णय आहे. मी एकटा मालक नाही, असेही संजय क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com