Jarange Factor : धसका कायम...जरांगेंच्या भेटीसाठी सोलापुरातील पाच उमेदवारांची अंतरवाली सराटीची वारी!

Assembly Election 2024 : लोकसभेचा अनुभव लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये, याची पुरेपूर दक्षता उमेदवार घेताना दिसत आहेत.
Manoj Jarange Factor
Manoj Jarange FactorSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 November : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापू लागली असून उमेदवारांकडून विजयाची गणितं जुळविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ने भल्या भल्यांच्या दांड्या गूल केल्या आहेत, तो धसका अजूनही कायम आहे. लोकसभेचा अनुभव लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये, याची पुरेपूर दक्षता उमेदवार घेताना दिसत आहेत. त्यातूनच सोलापूर जिल्ह्यातील पाच उमेदवारांनी आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे सहकार्याची अपेक्षा केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली आहे. विशेषत: मराठवाड्यातील मातब्बर नेत्यांना जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका बसला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्या पराभवामध्ये जरांगे फॅक्टरने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली, हे कोणीही नाकारू शकत नाही. भाजपच्या विरोधात भूमिका घेतली गेल्याने या बड्या नेत्यांनाही पराभवाला समोरे जावे लागले होते.

लोकसभा निवडणुकीत बड्या नेत्यांच्या झालेल्या पराभवाचा धसका विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) उमेदवारांनी घेतल्याचे दिसून येते. त्यातूनच हे उमेदवार जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीची वारी करत आहेत. प्रत्यक्ष प्रचाराच्या आधीच हे उमेदवार मनोज जरांगे पाटील यांचा फटका बसू नये यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत. या भेटीतून ते जरांगे पाटील यांचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Manoj Jarange Factor
Sopal Meet Jarange Patil : राजेंद्र राऊतांचे कट्टर विरोधक दिलीप सोपलांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

सोलापूर जिल्ह्यातील पाच उमेदवारांनी आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यामध्ये माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माढ्याचे रणजितसिंह शिंदे, पंढरपूरचे अनिल सावंत आणि भगीरथ भालके यांचा त्यामध्ये समावेश आहे. यात म्हेत्रे यांचा भाजपचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी सामना होत आहे.

दुसरीकडे पंढरपूर अनिल सावंत आणि भगीरथ भालके यांचीही भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्याशी लढत होत आहे. रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील हे उमेदवार आहेत. बार्शीत दिलीप सोपल यांचा सामना राजेंद्र राऊत यांच्याशी होत आहे. राऊत यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली होती, त्यामुळे बार्शीत जरांगे पाटील यांची भूमिका महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Factor
Shirala Constituency : फडणवीसांची यशस्वी शिष्टाई; सम्राट महाडिकांची माघार, देशमुखांना पाठिंबा जाहीर

लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता विधानसभेला छोटी छोटी समीकरणेही महत्त्वाची ठरणार आहेत, त्यातून काठावर निकाल लागण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उमेदवारांनी कसोशीने प्रयत्न चालवले आहेत. जरांगे पाटील यांची त्यांना मदत मिळते की नाही, हे प्रत्यक्ष निकालानंतर समजणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com