Shirala Constituency : फडणवीसांची यशस्वी शिष्टाई; सम्राट महाडिकांची माघार, देशमुखांना पाठिंबा जाहीर

Assembly Election 2024 : सांगली जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघातील भाजपमधील बंड अखेर थंड झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली असून सम्राट महाडिक यांनी निर्माण केलेलं आव्हान शमविण्यात अखेर भारतीय जनता पक्षाला यश आलं आहे.
Samrat Mahadik
Samrat Mahadik Sarkarnama
Published on
Updated on

Sangli, 02 November : सांगली जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघातील भाजपमधील बंड अखेर थंड झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली असून सम्राट महाडिक यांनी निर्माण केलेलं आव्हान शमविण्यात अखेर भारतीय जनता पक्षाला यश आलं आहे. सम्राट महाडिक यांनी शिराळ्यातून माघार घेत भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

पत्रकार परिषद घेऊन सम्राट महाडिक (Samrat Mahadik) यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. भाजपचे शिराळा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित देशमुख यांना पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यामुळे भाजपच्या सत्यजित देशमुख यांच्यासमोरी अडचणी काहींशा कमी झाल्या आहेत.

शिराळा मतदारसंघातून (Shirala Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मानसिंगराव नाईक हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात महायुतीकडून भाजपचे सत्यजित देशमुख हे निवडणुकीच्या रिंणगात उतरले आहेत. भाजपने उमेदवारीमध्ये डावल्यानंतर सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.

Samrat Mahadik
Ramesh Kadam : मुलीची उमेदवारी कापल्यानंतर रमेश कदमांनी घेतली पवारांची भेट; माघार की लढणार उत्सुकता कायम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सम्राट महाडिक यांना मुंबईत बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सम्राट महाडिकांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं स्पष्ट केले आहे, त्याचबरोबर येत्या 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेऊन सत्यजित देशमुख यांच्या पाठिंब्यासाठी जाहीर मेळावा घेणार असल्याचेही महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शिराळा मतदारसंघातील भाजपमधील बंडखोरी रोखण्यात भारतीय जनता पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे, त्यामुळे शिराळा मतदारसंघातील लढत आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटविरुद्ध भाजप अशी एकास एक होणार आहे.

Samrat Mahadik
Sopal Meet Jarange Patil : राजेंद्र राऊतांचे कट्टर विरोधक दिलीप सोपलांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रयत्न केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच महाडिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली हेाती. मात्र, सम्राट महाडिक यांना भाजपची उमेदवारी मिळवून देण्यात अपयश आले होते. त्यानंतर सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, फडणवीसांच्या यशस्वी शिष्टाईनंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com