
आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसुरक्षा कायदा पुन्हा चर्चेत आला आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विरोधक रस्त्यावर उतरले आहेत.
महाविकास आघाडीने सांगलीत मोठे आंदोलन केले.
रोहित आर आर पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
त्यांनी टोला लगावला की, “आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही नक्षलवादी ठरवतील.”
Sangli News : राज्यातील महायुतीच्या सरकारने पावसाळी अधिवेशनात (जुलै 2025) सर्वात मोठा निर्णय घेत जनसुरक्षा विधेयक पास केले. हे विधेयक विधानसभेत एकताने मंजूर करण्यात आले होते. त्यावेळी सभागृहासह राज्यभर विरोधी पक्षांनी यास जोरदार विरोध केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा आगामी स्थानिकच्या तोंडावर विरोधकांनी हाच मुद्दा घेऊन पुन्हा एकदा रान उठवण्यास सुरूवात केली आहे. कोल्हापुरसह सांगली जिल्ह्यात या कायद्याविरोधात विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. सांगलीत महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित आर आर पाटील यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. त्यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी करत 'आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकार नक्षलवादी ठरवेल, असा टोला देखील सरकारला लगावला आहे.
शहरातील स्टेशन चौक येथे महाविकास आघाडीच्यावतीने सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये आमदार रोहित पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते. शहरी नक्षलवाद नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने विधानसभेत एकमताने जनसुरक्षा विधेयक मंजूर केले आहे. हा कायदा कुठल्याही डाव्या विचारांच्या, संघटनांच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील चर्चेवेळी जुलै महिन्यात दिले होते.
यानंतर ते राज्यपालांच्या अंतिम स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाले होते. यादरम्यान सभागृहासह रस्त्यावर उतरून विरोधकांनी याला जोरदार विरोध केला होता. पण त्यानंतर काही काळ हा मुद्दा मागे पडला होता. पण आता पुन्हा एकदा स्थानिकच्या तोंडावर विरोधकांनी या मुद्द्याला हात घातला आहे. पुन्हा एकदा या कायद्याविरोधात विरोधकांकडून आंदोलने केली जात आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा विरोधात सांगलीमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या कायद्याचा निषेध म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनसुरक्षा कायदा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आमदार रोहित पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना, यापुढे जनसुरक्षा कायद्या विरोधात जन चळवळ उभारण्याचा निर्धार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली. आमदार रोहित पाटील यांनी 'आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकार नक्षलवादी ठरवेल. त्यामुळे हा कायदाच सरकारने रद्द करावा, अशी मागणी केली.
दरम्यान याधीही मुंबईत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात पावसाळी अधिवेशनाच्या (जुलै 2025) काळात आझाद मैदानात जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीने आंदोलन केले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्कर जाधव, माकप आमदार विनोद निकोले आदी नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. त्यावेळी आमदार रोहित पाटील यांनी देखील आंदोलनास पाठिंबा दिला होता.
प्रश्न 1: जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन कुठे झाले?
उत्तर: सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात.
प्रश्न 2: आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले?
उत्तर: महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
प्रश्न 3: रोहित आर आर पाटील यांनी काय विधान केले?
उत्तर: त्यांनी महायुतीवर टीका करत शेतकऱ्यांनाही नक्षलवादी ठरवले जाईल असा टोला लगावला.
प्रश्न 4: विरोधकांची मागणी काय आहे?
उत्तर: जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी.
प्रश्न 5: आंदोलनाचा राजकीय संदर्भ काय आहे?
उत्तर: आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा उचलला गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.