
Sangli, 09 August : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र्य नात्याचा सण. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या सर्वार्थाने रक्षणाची जबाबदारी घेतो. एका गरीब बहिणीच्या ऑपरेशनची सोय करून तिला मरणाच्या दारातून बाहेर आणले, त्याच बहिणीने आपल्या आमदार भावाला राखी बांधण्याचा हट्ट धरला आणि त्या युवा आमदाराने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन राखी बांधून घेत तिचा हट्ट पुरवला.
ही गोष्ट राज्याचे माजी उपमुख्यमंत्री (स्व.) आर. आर. पाटील यांचे चिरंजीव तथा तासगावचे तरुण आमदार रोहित पाटील (Rohit Patil) यांची. आमदार म्हणून मतदारसंघातील नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या लोकप्रतिनिधी या नात्याने सोडवाव्या लागतात. सरकारी पातळीवर ती समस्या सुटत नसल्याने वैयक्तीक पातळीवरील संबंधांचा उपयोग करून त्यावर मार्ग काढावा लागतो.
आर. आर. पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील राणी चौगुले यांच्यावर एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या महिलेचा आमदार रोहित पाटील यांना आग्रह बांधण्याचा आग्रह होता. त्यासाठी त्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आग्रह करीत होत्या. अखेर आमदार रोहित पाटील यांना आपल्या लाडक्या बहिणीचा आग्रह पूर्ण करावा लागला.
याबाबत स्वतः आमदार रोहित पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये आमदार पाटील म्हणतात की, कवठे महांकाळ येथील माझ्या भगिनी सौ राणी चौगुले यांचे जून महिन्यामध्ये आर. आर. पाटील प्रतिष्ठान माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया पार पडली होती. मला ज्याने मरणाच्या दारातून परत आणले आहे, त्या माझ्या भावाला मला राखी बांधायची आहे, असा हट्ट गेली अनेक दिवस त्या मला फोन करून व माझ्या सहकाऱ्यांकडे करत होत्या.
राखी बांधण्याचा आपल्या लाडक्या बहिणीचा हट्ट आमदार पाटील यांना पुरवावा लागला. याबाबत राखी बांधण्याचा हट्ट धरून बसलेल्या राणी चौगुले यांच्याकडे आज जाऊन त्यांच्याकडून मायेची राखी बांधली. मतदारसंघातील माता भगिनींबरोबर सेवेच्या माध्यमातून हे भावाच नातं मी नेहमी जपेन, एवढाच शब्द...!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.