Solapur NCP SP : पवारांच्या सोलापुरातील नेत्यावर वाल्मिक कराडप्रमाणे आरोप; मारहाणीत तरुणाचा मृत्यू : खून, खंडणीचा गुन्हा दाखल

Solapur Crime News : प्रमोद गायकवाड यांच्या जामीनासाठी मंत्रालयातून हालचाली होत आहेत. त्यांच्यापासून आमच्या कुटुंबीयांना धोका आहे, त्यामुळे पवारांनी गायकवाड यांची आपल्या पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे.
Pramod Gaikwad
Pramod GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 January : भांडण सोडविण्यासाठी आलेला वैभव वाघे या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने सोलापूरचे माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह त्यांचे दोन मुलगे, पुतण्या आणि इतर दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गायकवाड, त्यांच्या दोन मुलांसह चौघांना अटक करण्यात आला आहे. गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत वैभव वाघेचा मृत्यू झाला आहे, प्रमोद गायकवाड हे सोलापूरचा वाल्मिक कराड आहे, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करावी, अशी माझी शरद पवारांना विनंती आहे, अशी मागणी पीडित कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, सिद्धार्थ हौसिंग सोसायटीचे सभासद करण्यासाठी आणि एनओसी देण्यासाठी तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा प्रमोद गायकवाड (Pramod Gaikwad) यांच्यावर दाखल झालेला आहे. त्यामुळे शरद पवार गटाचा सोलापुरात (Solapur) नेता चांगलाच अडचणीत सापडला आहे. गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

वैभव वाघे याच्या मृत्यूप्रकरणी माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, त्यांचे मुले प्रसेनजीत उर्फ लकी प्रमोद गायकवाड, हर्षजीत ऊर्फ विकी प्रमोद गायकवाड, पुतण्या सोन्या उर्फ संजय देवेंद्र गायकवाड, सनी निकंबे आणि मनोज राजू अंकुश या पाच जणांवर सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, वाघे याचा उपचारादरम्यान मृत्य झाला, त्या या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील प्रमोद गायकवाड आणि त्यांच्या दोन मुलासह मनोज अंकुश यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सीमा विलास गायकवाड यांनी फिर्याद दिली होती.

Pramod Gaikwad
Ravi Rana Vs Bacchu Kadu : रवी राणांच्या दाव्यावर बच्चू कडूंची मिश्किल टीका; ‘भाजपला मंत्रिपदापेक्षा मोठे...’

प्रमोद गायकवाड आणि सनी निकंबे हे दारू पिऊन आदित्य नावाच्या तरुणाला मारहाण करत होते. त्या वेळी सीमा गायकवाड, त्यांची दोन मुले सुमीत आणि रितेश गायकवाड आणि भांडण सोडविण्यासाठी आलेला वैभव वाजे व इतर दोघांना प्रमोद गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. त्या मारहणीत वैभव वाघे हा गंभीर जखमी झाला होता, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, वैभव वाघे याला न्याय मिळावा; म्हणून सोलापुरात कॅडल रॅली काढण्यात आली होती. त्या वेळी पीडित कुटुंबाने प्रमोद गायकवाड हे सोलापूरचे वाल्मिक कराड आहे. त्यांची शरद पवार यांनी आपल्या पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, प्रमोद गायकवाड यांच्या जामीनासाठी मंत्रालयातून हालचाली होत आहेत. त्यांच्यापासून आमच्या कुटुंबीयांना धोका आहे, त्यामुळे पवारांनी गायकवाड यांची आपल्या पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे.

Pramod Gaikwad
Santosh Deshmukh Murder : संजय शिरसाटांचे मोठे विधान; ‘दोन दिवस वाट पाहा, वाल्मिक कराड किंवा आणखी कोणी...? तोही यातून वाचणार नाही’

दरम्यान, सिद्धार्थ हौसिंग सोसायटीत सभासद करून घेण्यासाठी दोन लाखांची, तर एनओसी देण्यासाठी दुसऱ्या एका महिलेला एक लाखाची मागणी करून दमदाटी केल्या प्रकरणी प्रमोद गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सुशील तिपण्णा पोतेनवरू आणि मीनाक्षी संजय जगताप यांनी फिर्याद दिली हेाती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com