Ajit Pawar : अजितदादांचा निर्णय चुकला? माजी आमदाराच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

NCP Politics : राज्याच्या राजकारणात घौडदौड करणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सांगली जिल्ह्यात मात्र नाराजी नाट्याला सामोरं जावं लागलं आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला सांगली जिल्ह्यात आता कुठे चार दिवस चांगले येत होते. येथे चार माजी आमदारांनी घड्याळ हाती बांधत भाजप, शरद पवार यांच्यासह काँग्रेसला यांना धक्का दिला होता. यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीत इनकमिंग वाढले होते. पण आता येथे झालेल्या एका माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशामुळे नाराजी नाट्य सुरू झाले असून एका नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पक्षाध्यक्ष अजितदादा यांनी घेतलेला निर्णय चुकला अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. तसेच या तडकाफडकी राजीनाम्याने जतच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे.

विधानसभेनंतर निशिकांत पाटील यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवण्याकडे लक्ष दिले होते. पदरात कोणतेही पद नसताना त्यांनी चार ते पाच माजी आमदारांनी राष्ट्रवादीत आणण्याचा यशस्वी प्लॅन तयार केला. त्याप्रमाणे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील या नेत्यांचा पक्ष प्रवेश अजित पवार यांच्या उपस्थितीत देखील झाला. तर आता माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.

पण माजी आ. विलासराव जगताप यांच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी पक्षात धुसफूस सुरू झाली असून पक्षात पहिली विकेट पडली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी आपल्या पदाचा तडका फडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे पाठवून दिला आहे. ते गेल्या दीड दोन वर्षांपासून जत तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण आता त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने जतच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणता विक्रम केला माहिती आहे का?, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनीही सांगितले.

पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मी सुनिल रावसाहेब पवार, गेली दीड वर्षे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रसार करण्यामध्ये अग्रेसरपणे काम करत होतो. पण गेल्या काही दिवसांमध्ये जत तालुक्यातील ज्या लोकांनी विधान सभेला महायुतीच्या उमेदवारांविरुध्द जातीने काम केले, त्यांनाच पक्षात घेताना निष्ठावंतांना विचारात घेतले नाही.

दरम्यान, अलीकडे सर्व निर्णय प्रक्रियेत डावलले जात आहे. तसेच जिल्हास्तरीय नेतृत्वाकडून जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुध्द सातत्याने जाहीररित्या पत्रकार परिषद घेणे, त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप करण्यासह वारंवार दबावाचे राजकारण सुरु झाले होते. महायुतीत राहून सहकारी पक्षाबद्दल असं वर्तणूक करणे मला उचित वाटले नाही. यामुळे व्यथित होवून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : अजितदादांनी शब्द खरा केला; ‘माळेगाव’च्या चेअरमनपदाची धुरा स्वीकारली, उपाध्यक्षपदी महिलेला संधी!

विलासरावांच्या पक्ष प्रवेशाने धुसफूस...

गेल्या दीड वर्षांपासून सुनील पवार हे पक्षात सक्रिय होते. मात्र, माजी आ. विलासराव जगताप यांच्या पक्ष प्रवेशानंतर पक्षात धुसफूस सुरू होती. हा प्रवेश झाल्यापासूनच सुनील पवार हे नाराज होते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच जगताप व पडळकर यांच्या राजकीय संघर्ष होता. पडळकर यांच्या उमेदवारीवरून जगताप यांनी जोरदार आवाज उठविला होता. पवारांचे पडळकरांसोबत सख्य आहे. त्यामुळे पक्षात अंतर्गत धुसफूस सुरूच होती. अखेर पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. एकेकाळी जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून पवार ओळखले जात होते. पण आता त्याच जगतापांशी पवार यांनी फारकत घेतली असून ते पुढे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com