Ajit Pawar : अजितदादांनी शब्द खरा केला; ‘माळेगाव’च्या चेअरमनपदाची धुरा स्वीकारली, उपाध्यक्षपदी महिलेला संधी!

Malegaon Sugar Factory Election 2025 : 'माळेगाव'चे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार होणार, हे निश्चित होते. कारण त्यांनी निवडणुकीत तशी घोषणाच केली होती. मात्र, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता होती.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Baramati, 05 July : संपूर्ण राज्यात गाजलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला शब्द करून दाखवला आहे. निवडणुकीच्या काळात जाहीर केल्याप्रमाणे माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्वीकारली, त्यामुळे ‘माळेगाव’मध्ये आता ‘अजितपर्वा’ची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

माळेगावचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) होणार, हे निश्चित होते. कारण त्यांनी निवडणुकीत तशी घोषणाच केली होती. मात्र, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता होती. अनेक दिग्गजांना मागे टाकून नीरा वागज गटातून निवडून आलेल्या संगीता बाळासाहेब कोकरे यांनी उपाध्यक्षपदी बाजी मारली आहे. या वेळी कारखान्याचे मावळते अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे उपस्थित होते.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Malegaon Sugar Factory Election) अजित पवार यांच्याशिवाय जिंकणे राष्ट्रवादीच्या पॅनेलला अवघड होते. काही जागांवर स्पष्टपणे पराभव दिसून येत होता. तसे फिडबॅकही मिळत होते, त्यामुळे अजितदादा पवार यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ते तेवढ्यावच थांबले नाही तर त्यांनी आपणच पाच वर्षे माळेगाव सहकारी कारखान्याचे चेअरमन होणार, असे जाहीर केले होते.

अजित पवारांनी टाकलेल्या डावात विरोधक चारीमुंड्या चित झाले. आतापर्यंतच्या निवडणुकीत जेव्हा पवारांचा पॅनेल माळेगावची निवडणूक जिंकत असे, त्यावेळी विरोधी गटाचे चार ते पाच संचालक कायम असायचे. पण अजित पवारांनी डावच असा टाकला की, यावेळी माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे सोडता दिग्गजांना निवडणूक जिंकणेही दुरापस्त झाले.

Ajit Pawar
NCP Politic's : राष्ट्रवादीत मोठी घडामोड; जयंत पाटील अन्‌ अजितदादा यांच्यात अर्धा तास चर्चा!

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नीळकंठेश्वर पॅनेलने २०-०१ विजय मिळविला, त्यानंतर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज झाली. निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली माळेगावचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, तर उपाध्यक्षपदासाठी संगीता कोकरे यांचे एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.

माळेगावचे चेअरमन झाल्यानंतर अजित पवार यांचे सहकार क्षेत्रातील राजकारणात कमबॅक झाले आहे. आता अजित पवारांच्या हाती पाच वर्षे माळेगाव कारखान्याची नियोजन असणार आहे. त्यांना सहकार क्षेत्रात सुमारे ३५ वर्षांच्या कामाचा अनुभव आहे. तसेच, संगीता बाळासाहेब कोकरे या गेली २५ वर्षांपासून माळेगावच्या संचालिका म्हणून काम पाहत आहेत. त्यानुसार सहकार क्षेत्रात अनेक वर्षे काम केलेल्या दोघांची माळेगावची धुरा असणार आहे.

उसाच्या शेतात आगामी पाच वर्षांत एआय तंत्रज्ञान आणून माळेगाव कारखान्याचे चित्र पालटून दाखवू. तसेच कारभार करताना काटकसर आणि धोरणात्मक निर्णयावर भर देऊन राज्यात सर्वाधिक ऊसदर देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार असल्याचेही असे अजित पवार यांनी सांगितले.

‘माळेगाव’चे स्थापनेपासून आजपर्यंतचे चेअरमन

१) (कै) गणेश गोपाळ शेंबेकर उर्फ दादासाहेब (३१.८. १९५५)

२) दत्तात्रय गणेश शेंबेकर (१९५५-१९५९),

३) वीरसिंह चंद्रसेन जाधवराव (१८.५.१९६० - २७.१०.१९६४)

४) श्रीरंगराव कृष्णराव जगताप (२८.१०.१९६४ ते ३०. ६.१९६७)

५) माधवराव गेनबा तावरे (३१.६.१९६७ ते २१.१२.१९६७)

६) भीमदेवराव साधुजी गोफणे (२२.१२.१९६७ ते ३०. ६.१९६८)

७) माधवराव गेनबा तावरे (१९. ७.१९६८ ते ३०.११.१९६८)

८) शंकरराव गणेश दाते (१.१२.१९६८ ते ३०.११.१९६९)

९) गुलाबराव साहेबराव ढवाण (३०.११.१९६९ ते २०.१२.१९७०)

१०) माधवराव गेनबा तावरे (२६.१२.१९७० ते १२.१२.१९७३ )

Ajit Pawar
Raj Thackeray : सुरेश जैनांचे नाव ऐकताच बाळासाहेब म्हणाले, ‘...त्यांना जाऊन सांग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल’ : राज ठाकरेंनी सांगितला 1999 चा प्रसंग

११) वीरसिंह चंद्रसेन जाधवराव (१२.१२.१९७३ ते ३०. ७.१९७९)

१२) शिवलिंग संगमनाथ हिरेमठ ( ३१. ७.१९७९ ते २७.११.१९८५)

१३) चंद्रराव कृष्णराव तावरे (२८.११.१९८५ ते १७. ८.१९९२, ९. ९. १९९७ ते ५. ४.२०००, २०. ५.२००५ ते १५.११.२००७ )

१४) बाळासाहेब पाटील तावरे (२८. ९.१९९३ ते ८. ९.१९९७, १८.०९.२००२ ते १९. ५.२००५, १६.११.२००७ ते १८. ४.२०१५, ८. ३.२०२० ते २२.९.२०२३),

१५) संपतराव केशवराव तावरे (६. ४.२००० ते १७. ९.२००२)

१६) रंजनकुमार शंकरराव तावरे (१९.४.२०१५ ते ७. ३.२०२०)

१७) केशवराव सर्जेराव जगताप (२२.९.२०२३ ते ५.७.२०२५)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com