Rahul Gandhi News : चौदा वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापुरात, पश्चिम महाराष्ट्रात करणार मशागत

Political News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधी यांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला दौरा महत्वपूर्ण मानला गेला. त्याला महिना उलटला नसताना राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा काँग्रेस जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरणार आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : 2009 नंतर एका कार्यक्रमात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यानंतर तब्बल 14 वर्षानंतर राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असून गेल्या महिनाभरात पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची गांधी यांनी मशागत सुरू केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गांधी यांनी सांगली त्यानंतर कोल्हापुरात 4 ऑक्टोबरला हजेरी लावणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. काँग्रेसची युवा फळी त्यांना पाठबळ देत असून त्यानिमित्ताने काँग्रेसला उर्जित अवस्था देण्यासाठी राहुल गांधी यांचे प्रयत्न हे यशस्वी टप्प्यावर असल्याचे दिसून येते. (Rahul Gandhi News)

5 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी राहुल गांधी यांचा दौरा महत्वपूर्ण ठरला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) मिळालेल्या यशानंतर राहुल गांधी यांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला दौरा महत्वपूर्ण मानला गेला. त्याला महिना उलटला नसताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा कोल्हापूर दौरा काँग्रेस जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरणार आहे.

Rahul Gandhi
Sharad Pawar : शरद पवार खरेच बोलले..! 'ही' पिढी, अन् तीही पिढी, फरक स्पष्ट आहे!

लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहू महाराज आणि सांगलीतून विशाल पाटील यांच्या विजयानंतर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला अच्छे दिन आल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांना अधिक बळ येणार आहे. त्याशिवाय युवा काँग्रेसमध्ये देखील चैतन्याचे वातावरण निर्माण होईल, असा अंदाज आहे.

राहुल गांधींची नवी फळी पश्चिम महाराष्ट्रात सज्ज कोल्हापुरातून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, सांगलीतून नेते विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसला नवचैतन्य आणण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. लोकसभा निवडणुकीतील त्यांची पटलावरील राजकीय खेळी महत्त्वपूर्ण ठरली आहे. तीच रणनीती विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येणार आहे.

Rahul Gandhi
Ankita Patil News : अंकिता पाटलांचं ठरलं; उद्या देणार भाजपचा राजीनामा ?

त्याशिवाय राहुल गांधी यांच्या थेट संपर्कात असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय युवा पिढी चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. उद्या राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर राहुल गांधी यांचा 5 ऑक्टोंबरला कोल्हापूर दौरा असणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ते कोल्हापूर विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर कसबा बावडा येथील भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा बहु शस्त्रधारी पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

शुक्रवारी त्यांचा कोल्हापूरमध्ये मुक्काम असणार आहे. 5 ऑक्टोंबरला एक वाजता ते शाहू समाधीस्थळ या ठिकाणी उपस्थित राहणार असून दुपारी अडीच वाजता ते हॉटेल सयाजी येथे संविधान परिषदेला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर चार वाजता ते कोल्हापूर विमानतळाकडे रवाना होणार आहेत.

Rahul Gandhi
Nagpur News : नागपूरमधील 'या' नगरसेवकांना लागले आमदारकीचे वेध

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com