चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरात राष्ट्रवादीला धक्का: महत्वाचा मोहरा लावला गळाला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप देसाई यांचा भाजपमध्ये प्रवेश
Sandeep Desai-Chandrakant Patil
Sandeep Desai-Chandrakant Patil sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर (kolhapur) उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (ncp) धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप देसाई यांनी आज (ता. ३१ मार्च) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. चंद्रकांतदादांनी त्यांचे पक्षात स्वागत करत देसाई यांना राज्यस्तरावरील पद दिले आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच देसाई यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (NCP's Sandeep Desai joins BJP)

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संदीप देसाई यांचे पक्षात स्वागत करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांची भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून, त्यांना पत्रही प्रदान करण्यात आले. देसाई यांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्या ठिकाणी त्यांचे मन काही रमले नाही. काही महिन्यांतच त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.

Sandeep Desai-Chandrakant Patil
ईडीच्या कारवाईनंतर ॲड उकेंच्या वडिलांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

संदीप देसाई यांच्या भाजप प्रवेशानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, देसाई हे सामाजिक जाणीव असणारे कार्यकर्ते आहेत. ते स्वगृही भाजपमध्ये परतल्याने आनंद झाला. भाजपचा विचार घरोघरी पोचवून उत्तर मतदारसंघात सत्यजित कदम यांना निवडून आणण्यात त्यांचे मोठे योगदान असेल, असा मला विश्वास वाटतो.

Sandeep Desai-Chandrakant Patil
'...तर राज्यातील जनता ॲड. गुणरत्न सदावर्तेंना डोक्यावर घेऊन नाचेल'

संदीप देसाई हे पूर्वी भाजपमध्ये सक्रिय होते. युवा मोर्चाचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. गेल्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आज त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देसाई म्हणाले की, मी नेहमीच राष्ट्रीय विचाराने सामाजिक काम करतो, त्यामुळे भाजपकडे माझा ओढा होताच. नव्याने पक्ष प्रवेश करून पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न करेन.

Sandeep Desai-Chandrakant Patil
भरणेंकडून हर्षवर्धन पाटलांना धक्क्यावर धक्के : आक्रमक युवा नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश!

जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस हेमंत अराध्ये, विवेक कुलकर्णी, सचिन तोडकर, प्रवीण चौगुले रमेश दिवेकर रोहित पाटील नरेश जाधव अविनाश साळे दीपक देसाई राहुल घाडगे रोहित फराकटे अवधूत कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com