Shivsena Vs Bjp News: तोंड फोडण्याची भाषा, महायुतीत सर्वकाही ठीक आहे का? शिंदे गटाच्या नेत्याची 'या' दोन शब्दांतच 'रिअ‍ॅक्शन'

Neelam Gorhe On Ramdas Kadam And Ravindra Chavan Dispute : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे जागा वाटपासंदर्भात चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करूनच जागा वाटप असा निर्णय होईल.
Ravindra Chavan-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ramdas kadam
Ravindra Chavan-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ramdas kadamSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : अनेक मुद्द्यावरून महायुतीतील आमदारांची एकमेकांबाबत खडाखडी सुरु आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप नव्हे तर उघड उघडं तोंड फोडण्याची भाषा वापरण्यापर्यंत मजल गेली आहे. भाजपचे नेते आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणी यांच्यात खडाजंगी सुरु झाली आहे.

त्यावरून रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी संतापून रामदास कदम यांचे तोंड फोडण्याची भाषा केली. तर कदम यांनी देखील त्याला प्रत्युत्तर देत 100 जन्म घ्यावे लागतील असे विधान केले. या वक्तव्यानंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये सर्व काही ठीक आहे का? असा सवाल सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सध्या महायुतीतील नेते तोंड फोडण्याची भाषा करत आहेत. महायुतीत सर्व काही ठीक आहे का असा प्रश्न केला. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी थेट "नो कमेंट्स" असे उत्तर देत प्रतिक्रिया देणे टाळले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे जागा वाटपा संदर्भात चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करूनच जागा वाटप असा निर्णय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच याबाबत निर्णय घेतील त्यामुळे आम्ही निश्चित आहोत अशी प्रतिक्रिया गोऱ्हे यांनी दिली.

Ravindra Chavan-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ramdas kadam
Video Badlapur Protest : महाजनांनी पाठ फिरवताच बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज; पोलिसांवर दगडफेक

कोल्हापुरात 'कही ख़ुशी कही गम'

कोल्हापुरातील किती जागांवर शिवसेना शिंदे गटाचा असेल, यावर बोलताना नीलम गोऱ्हे यांनी लोकसभेबाबत नाराजी व्यक्त केली. लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील जुनी जागांबाबत कही खुशी कही गम अशी परिस्थिती आमची झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत योग्य ते पावले आम्ही उचलू. मुख्यमंत्री शिंदे याबाबत निर्णय घेतील, असे गोऱ्हे म्हणाल्या.

महायुतीतील शिवसेना - भाजप शीतयुद्धाने सोमवारी वेगळे वळण घेतले.माजी मंत्री रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचा कुचकामी, चमकोगिरी करणारे मंत्री असा उल्लेख केला होता.यानंतर चव्हाण यांनी देखील करारी जवाब देत कदमांना हिसका दाखवला. त्यांनी थेट तोंड फोडण्याची भाषा वापरली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुचकामी,चमकोगिरी करणारे मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदम यांनी केली.

Ravindra Chavan-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ramdas kadam
Devendra Fadnavis Big Action In Badlapur Case: बदलापूर आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; फडणवीसांच्या गृह विभागाची मोठी कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com