

Dhairyashil Mane, Nivedita Mane
sarkarnama
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Kolhapur District Bank Election) नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. या निवडणुकीत शिवेसेनेच्या (ShivSena) नेतृत्वाखाली समविचारी पक्षाचे स्वतंत्र्य पॅनेल आहे. मात्र, शिवेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार श्रीमती निवेदिता माने (Nivedita Mane) यांनीच पक्षाची सात सोडली आहे.
निवेदिता माने यांनी शिवसेनेला सोडून सत्तारुढ गटाची उमेदवारी स्वीकारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्याचे पालकमंत्री काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्तारुढ पॅनल आहे. या निवडणुकीत महिला प्रतिनिधी गटातून सत्तारुढ गटाकडून त्या उमेदवार आहेत. माने यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यावर माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आघाडीत असणारे संजय घाटगे, संग्राम कुपेकर आणि मी शिवसैनिक असल्याचे सांगत माजी खासदार निवेदिता माने यांनी जेष्ठ नेते (कै.) रत्नाप्पा कुंभार यांचा दाखला दिला. कुंभारांना काँग्रेस पक्षाशी संघर्ष करावा लागला, त्यावेळी त्यांनी आपल्या रक्तातच काँग्रेस असल्याचे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे सहकाराच्या बळकटीसाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून आघाडीत सामील झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने कोल्हापूरात झालेल्या सर्व घडमोडींची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आणि संस्थांमध्ये सोयीचे राजकारण केले जात, असल्याचा आरोपही माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केला होता.
दरम्यान, गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणुन शिवसेनेला भरभरुन दिले. जिल्हा परिषद, महानगरपालिका, गोकुळ ही त्याची उत्तम उदाहरणे आहे. मात्र, केवळ एका जागेच्या स्वार्थासाठी शिवसेनेतील काहींच्या अट्टाहासामुळे कोल्हापुर जिल्हा बँकेवर निवडणुक लादली" असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (ता. २५) येथे केला. ते छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभात बोलत होते.
पाच वर्षापुर्वी जिल्हाची आर्थिक खिखर संस्था अडचणीत होती. मात्र, राजकीय भवितव्याचा विचार न करता शिस्त अंगिकारून बँकेत स्थैर्य आणले. नवी आव्हाने पेलण्यासाठी पक्षीय जोडे बँकेबाहेर काढून सर्वांना बरोबर घेत कारभार केला. मात्र, झालेला विरोध वेदनादायी आहे. शिवसेनेचे संख्यात्मक बळ कमी असतानाही सन्मानाने सर्वच सत्ता स्थानात सामावुन घेतले. आताही दोन जागा आणि स्वीकृत एक अशी तडजोड केली. असताना मांडलेला सवतासुभा आणि होणारी टोकाची टिका चुकीची असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.