Sadabhau Khot : गोपीचंद पडळकरांबाबत बोलताना सदाभाऊ खोतांना अश्रू अनावर; म्हणाले, ‘रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ह्या माणसासोबत राहणार...’

Gopichand Padalkar News : अनेक लोकांना वाटतं, गोपीचंद पडळकर हे आक्रमक बोलतात. आम्ही आक्रमक बोललं नाही तर हे लोक आम्हाला नवैद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत, हे मी तुम्हाला सांगतो.
Gopichand Padalkar-Sadabhau Khot
Gopichand Padalkar-Sadabhau KhotSarkarnama
Published on
Updated on

Sangli, 24 August : आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांची दोस्ती संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. एसटीच्या आंदोलनापासून अनेक विषयांवर या दोघांनी मिळून आवाज उठवला आहे. दोघेही आक्रमक भाषणासाठी ओळखले जातात. पण, ते जेवढी कठोर टीका करतात, तेवढेच ते दोघे एकमेकांविषयी किती हळवे आहेत, हे आज दिसून आले. आम्ही एकमेकांना साथ दिली नाही विरोध आम्हाला नवैद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत, त्यामुळे शेवटपर्यंत आम्ही एकमेकांच्या साथीने राहू, असे वचन सदाभाऊ खोत यांनी पडळकर यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना दिले.

सांगली जिल्ह्यातील एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना अश्रू अनावर झाले होते. आमदार पडळकर यांची साथ आपण शेवटपर्यंत सोडणार नसल्याचे खोतांनी निक्षून सांगितले. त्यामुळे वातावरणही काळी काळ भावनिक झाले होते.

‘शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांच्यासोबत राहणार आहे,’ हे सांगून पडळकर यांच्याबाबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले. आमदार गोपीचंद पडळकर यांना साथ दिली नाही, तर आम्हा दोघांनाही विरोधक नवैद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत, असेही खोत यांनी म्हटले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर हे वंचित लोकांसाठी प्रस्थापितांच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेत आहेत, म्हणूनच प्रस्थापितांचा पडळकर यांच्यावर राग आहे, असा हल्लाबोलही आमदार खोत यांनी केला आहे.

Gopichand Padalkar-Sadabhau Khot
Satara Politic's : अजितदादांचा साताऱ्यात भाजपला दे धक्का; आमदार भोसलेंचे समर्थक माजी आमदारांचा पुतण्याच फोडला!

खोत म्हणाले, अनेक लोकांना वाटतं, गोपीचंद पडळकर हे आक्रमक बोलतात. आम्ही आक्रमक बोललं नाही तर हे लोक आम्हाला नवैद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत, हे मी तुम्हाला सांगतो. मग तुमचं कोण ऐकून घेणार? म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाखं नेतृत्व आपण कायम जपूया.

Gopichand Padalkar-Sadabhau Khot
ZP Election 2025 : आरक्षणाचं जुनं सूत्र विसरा; झेडपी, पंचायत समितीसाठी आता आरक्षणाचा नवा फॉर्म्युला!

मी बिरोबाच्या मंदिरात उभा आहे, बाळूमामांच्या समोर उभा आहे. मी तुम्हाला शब्द देतो की, ‘माझा रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत मी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत राहणार आहे’, हे सांगताना मात्र आमदार सदाभाऊ खोत यांचा कंठ दाटून आला होता, त्यांना अश्रू अनावर झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com