Kavita Mhetre News: भिडे यांच्या मिशा काढणाऱ्या व्यक्तीला एक लाख इनाम... राष्ट्रवादीच्या नेत्या कविता म्हेत्रेंची घोषणा

Sambhaji Bhide Controversy: महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात आज सकाळी सिध्दनाथ मंदिर ते महात्मा फुले चौक असा मोर्चा काढण्यात आला.
Mhaswad Morcha
Mhaswad Morchasarkarnama
Published on
Updated on

-सल्लाउद्दीन चोपदार

Mhaswad Morcha News: संभाजी भिडे यांच्या मिशा काढणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपये इनाम देण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या प्रा.कविता म्हेत्रे यांनी केली. महात्मा फुले यांच्या बाबतीत अपशब्द वापरणारे संभाजी भिडे यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी म्हसवड येथील शाहु, फुले, आंबेडकर विचार मंच, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावतीने म्हसवड शहरात थाळी नाद मोर्चा काढण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा गांधी यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी (मनोहर कुलकर्णी) Sambhaji Bhide यांच्या विरोधात आज सकाळी म्हसवड Mhaswad येथील सिध्दनाथ मंदिर ते महात्मा फुले चौकमार्गे हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या प्रा. कविता म्हेत्रे, किशोर सोनवणे, कॉग्रेसचे विकास गोंजारी, याबरेबरच जयराज राजेमाने,रणजीत येवगे, दाऊद मुल्ला, राजकुमार डोंबे, परेश व्होरा, विलास रुपनवर, बाळासाहेब आटपाडकर, अजित केवटे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रा. कविता म्हेत्रे म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण व बहुजन शिक्षणाचे कार्य अठराव्या शतकामध्ये ताकतीने आणि जोमाने केले म्हणूनच आज बहुजन व स्त्रिया आपल्या पायावरती उभा आहेत.या सुधारणेला खोडा घालण्यासाठी संभाजी भिडे सारखे नतदृष्टे प्रयत्न करीत आहेत.

Mhaswad Morcha
Satara Morcha News: संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ साताऱ्यात मोर्चा; प्रतिमेला दुग्धाभिषेक...

संभाजी भिडे यांचे वर देशद्रोह खटला दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी करुन येथील महात्मा फुले चौकात कार्यकर्त्यांनी थाळी वाजून या घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर येथील महसुल मंडलाधिकारी किशोर शेंडे यांना निवेदन देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com