Pandharpur News : लग्नमंडपातून वरातीऐवजी निघाली वरपित्याची अंत्ययात्रा; डीजेचा दणदणाट जिवावर बेतला

DJ Loud Sound Issue : पंढरपूर शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाला आहे.
Subhash Devmare
Subhash DevmareSarkarnama

Pandharpur News : डीजेचा दणदणाट वरपित्याच्या जिवावर बेतल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. मुलाच्या हळदीच्या वरातीत वरपिता सहभागी झाले हेाते. मात्र, डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे भरलेल्या लग्नमंडपात शोककळा पसरली आणि जेथून परण्याची वरात निघायची तेथून वरपित्याची अंत्ययात्रा निघाली. त्यामुळे पंढरपुरात हळहळ व्यक्त होत आहे. (One person died in Pandharpur due to loud sound of DJ)

पंढरपूर शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाला आहे. वरपित्याच्या मृत्यूमुळे देवमारे कुटुंबातील हळदीच्या लग्नमंडपात शोककळा पसरली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Subhash Devmare
Truck Drivers Strike : ट्रक चालकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार

पंढरपूर येथील सुभाष देवमारे यांच्या मुलगा अमित देवमारे या तरुणाचा आज (ता. २) दुपारी लग्न सोहळा आयोजिण्यात आला होता. डीजेच्या दणदणाटामध्ये नरदेवाची हळदीची वरात सोमवारी रात्री काढण्यात आली होती. त्यात वरपिता सुभाष देवमारे हेही सहभागी झाले होते.

घरापासून काढण्यात आलेली नवरदेवाची हळदीची वरात पंढपूरमधील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात आली. डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणात होता. त्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता सुभाष देवमारे जागेवरच कोसळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नातेवाईकांमध्ये घबराट पसरली.

सुभाष देवमारे यांना नातेवाईकांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित के. डीजेचा कर्कश आवाज आणि दणदणाटामुळे वरपिता देवमारे यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे.

Subhash Devmare
Hit And Run Act : 'हिट अँड रन' भाजपासाठी 'अॅक्सिडेंट स्पाॅट'...

सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे. या लग्नांमध्ये सध्या सर्रासपणे डीजेचा वापर करण्यात येत आहे. यापूर्वीही डीजेच्या दणदणाटामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, नियम तोडून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या या डीजेच्या दणदणाटाकडे पोलिस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची परिस्थिती आहे. नियमांपेक्षा जास्त डेसिबल आवाज सोडणाऱ्या डाॅल्बींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Edited By-Vijay Dudhale

Subhash Devmare
Maratha Reservation Issue : ‘जरांगेंनी समजून घ्यावे’; विखे पाटलांनी सरकारची बाजू मांडली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com