Shashikant Shinde, Mahesh Shinde
Shashikant Shinde, Mahesh Shindesarkarnama

Koregaon : मी इथंच संघर्ष करणार, इथंच लढणार अन्‌ त्याला झोपवणार... शशिकांत शिंदे

कोरेगाव Koregaon येथील कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिंदे गट शिवसेनेचे आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांना थेट आव्हान दिले.
Published on

सातारा : ''मी इथंच संघर्ष करणार, इथंच लढणार आणि त्याला झोपवणार,'' असा इशारा देत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपण कोरेगावातूनच आमदार महेश शिंदे यांच्याविरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले.

कोरेगाव येथील कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिंदे गट शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना थेट आव्हान दिले. गेली काही दिवसांपासून आमदार शशिकांत शिंदे आगामी विधानसभेची निवडणूक कोठून लढणार याची उत्सुकता लागली आहे.

Shashikant Shinde, Mahesh Shinde
शिवसेना संपविण्यासाठी भाजपकडून शिंदे गटाचा वापर... शशिकांत शिंदे

त्यांच्यापुढे सातारा, कोरेगाव व मुंबई असे तीन ठिकाणाहून लढण्याची संधी आहे. पण, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांना अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. पण, त्यांचा पारंपारिक मतदारसंघ कोरेगाव असल्याने त्यांनी तेथूनच लढण्याचे संकेत दिले आहेत.

Shashikant Shinde, Mahesh Shinde
खेड ग्रामपंचायत : तीन आमदारांना एकटे महेश शिंदे पडले भारी...

शशिकांत शिंदे म्हणाले, लोकशाही कोणी मारलेली नाही, कुणाच्या बापाच्यात लोकशाही संपविण्याचा दम नाही. लोकांना घाबरविण्याचा प्रकार सुरू आहे. सहन करण्याची क्षमता असते ज्या दिवशी सहनशिलता संपेल त्या दिवशी हा शशिकांत शिंदे राष्ट्रवादीला घेऊन काय आग लावतोय ते पहायची तयारी ठेवा. माझी तयारी आहे. मी इथंच संघर्ष करणार, इथंच लढणार आणि त्याला झोपवणार हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com