Dhairyasheel Mohite Patil : ‘बीडचं पार्सल परत पाठवलं; आता सोलापूर शहरातून राष्ट्रवादीचा एक तरी आमदार निवडून आणा’

NCP's Shiva Swarajya Yatra : लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना उद्देशून बीडचे पार्सल बीडला परत पाठवून देण्याची आमच्यात हिम्मत आहे, असे सांगून सोलापूरकरांना तसे आवाहन केले होते. सोलापूरकरांनी सातपुते यांचा पराभव केला, त्याबद्दल मोहिते पाटील यांनी सोलापूरकांचे आभार मानले.
Dhairyasheel Mohite Patil-Ram Satpute
Dhairyasheel Mohite Patil-Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 August : ‘बीडचं पार्सल, बीडला पाठवून द्या,’ असं आवाहन मी लोकसभा निवडणुकीवेळी अकलूजमधून केलं होतं. तुम्ही ते मनावर घेऊन आमचा शब्द खरा केला. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनी मतभेद विसरून यंदा सोलापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचा किमान एक आमदार तरी निवडून आणावा, असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा सोलापूरमध्ये मुक्कामी होती. त्या यात्रेच्या सभेत बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी सोलापूर शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून आणण्याचे आवाहन शहरातील पदाधिकाऱ्यांना केले.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर (Solapur) लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना उद्देशून बीडचे पार्सल बीडला परत पाठवून देण्याची आमच्यात हिम्मत आहे, असे सांगून सोलापूरकरांना तसे आवाहन केले होते. लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांनी राम सातपुते (Ram Satpute) यांचा पराभव केला, त्याबद्दल मोहिते पाटील यांनी सोलापूरकांचे आभार मानले.

Dhairyasheel Mohite Patil-Ram Satpute
Amol Kolhe Attack on DCM : अजितदादांनी कांदा उत्पादकांची माफी मागितली; पण शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली

लोकसभेला मी अकलूजमधून केलेले आवाहन तुम्ही मनावर घेऊन बीडचं पार्सल बीडला पाठवून आमचा शब्द खरा केला. आता माणसं घाबरायला लागली की कुठून उभे राहावे.

सोलापूर जिल्ह्याचे राजकारण 2009 नंतर बदलले आणि जिल्ह्याची पीछेहाट झाली. आपल्याला सलग 5 वर्षे स्थानिक पालकमंत्री मिळत नाही, ही आपली वाताहत झाली आहे, असेही खासदार मोहिते पाटील यांनी नमूद केले.

मोहिते पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल लोकसभेत चांगला लागला, त्यामुळे आता प्रत्येक विधानसभेत 8 ते 10 उमेदवार इच्छुक आहेत. मात्र आपल्याला आवाहन आहे की, कोणीही बंडखोरी करायची नाही. अन्यथा आपल्या जिल्ह्याची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही.

Dhairyasheel Mohite Patil-Ram Satpute
Shiv Swarajya Yatra : राष्ट्रवादीच्या शिव स्वराज्य यात्रेत सोलापुरात आज काय घडले?

सोलापूर जिल्ह्यातील जनतेने ठरवले आहे की, तुतारी, मशाल, हात आणि शेकाप यांना मतदान करायचे आहे, असा विश्वासही धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com