Subhash Deshmukh : सुभाष देशमुखांच्या उमेदवारीला विरोध वाढला; भाजपतील नाराजांनी गाठला फडणवीसांचा बंगला

Solapur BJP Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सुभाष देशमुख यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या नाराज गटाने केली आहे.
Subhash Deshmukh-BJP Leader
Subhash Deshmukh-BJP LeaderSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 October : माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात भाजपच्या पाच ते सहा माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा फडकावला आहे. सोलापूरमधील या माजी नगरसेवकांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सागर निवासस्थान गाठून सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. मात्र, सोलापूरच्या भाजप शिष्टमंडळाला फडणवीस यांनी पुढील आठवड्यात भेटीची वेळ दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) गटाचे माजी उपमहापौर यांच्यासह पाच ते सहा माजी नगरसेवकांनी सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्या वेळी वैद्य हे भाजपचे सदस्य ही नव्हते, तरीही त्यांना दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली होती.

भारतीय जनता पक्षाकडून शिस्तीचा बडगा उचलताच त्यांनी माघार घेतली होती. मात्र, नाराज गटाने पुन्हा उचल खाल्ली असून त्यांनी आता थेट फडणवीसांचा सागर बंगला गाठला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सुभाष देशमुख यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांच्याकडे या नाराज गटाने केली आहे.

Subhash Deshmukh-BJP Leader
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा फडणवीसांवर पलटवार; ‘ते तर 50 खोके गॅंगचे शिलेदार’

उद्योगपती रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आले आहेत, त्यामुळे फडणवीसांनी सोलापूरच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी पुढील आठवड्याची वेळ दिली आहे.

माजी सभागृह नेता श्रीनिवास करली, माजी नगरसेवक अशोक बिराजदार पाटील, श्रीनिवास बुरुड, माजी नगरसेवक वैभव हत्तुरे, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, अनिल चव्हाण, याशिवाय विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक मळसिद्ध मुगळे, सचिन चव्हाण, श्रीशैल हत्तुरे, आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने फडणीसांची भेट घेतली आहे. आता फडणवीस यावर काय निर्णय घेतात, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे

Subhash Deshmukh-BJP Leader
Mahayuti Election Strategy : महायुतीचे विधानसभेसाठी मायक्रो प्लॅनिंग; तीनही पक्षाची समन्वय समिती ठेवणार प्रचारावर ‘वॉच’

दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी सुभाष देशमुख यांना समन्वयक म्हणून एखादा कार्यकर्ता मिळू नये, हे दुर्दैवी आहे, अशी टीकाही सोलापुरातील नाराज गटाकडून करण्यात येत आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी महायुतीत समन्वयक म्हणून मनीष देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यावरूनही देशमुख यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com