Kolhapur Politics : काँग्रेससोबत नव्हे पी. एन. पाटलांशी एकनिष्ठ, राहुल पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला कार्यकर्त्यांचा 'ग्रीन सिग्नल'

Rahul Patil NCP Entry : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष राहुल पाटील हे सुरुवातीला भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर त्यांचा हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.
Rahul Patil
Rahul PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 24 Jul : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष राहुल पाटील हे सुरुवातीला भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर त्यांचा हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

काँग्रेस निष्ठावंत आणि  पी.एन. पाटलांच्या कट्टर समर्थकांनी भाजपमध्ये जाण्याला विरोध केल्यानंतर जवळपास हा पक्ष प्रवेश रखडला होता. सतत पुन्हा एकदा पाटील महायुतीतील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्याला आता कार्यकर्त्यांनीच हिरवा सिग्नल दिला असल्याचे चित्र आहे.

आम्ही काँग्रेससोबत एकनिष्ठ नसून पी.एन. पाटील यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं स्पष्ट केलं आहे. राहुल पाटील जो निर्णय घेतील त्यांच्या निर्णयासोबत आम्ही सर्व निष्ठेने ठाम राहू, असा सूर कार्यकर्त्यांनी आळवला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा मार्ग सुकर होणार असल्याचे चित्र आहे.

Rahul Patil
PWD recruitment scam : ना जाहिरात, ना भरती प्रक्रिया! बनावट सह्यांद्वारे तब्बल 31 जणांना सरकारी नोकरी, PWD मधील धक्कादायक प्रकास उघडकीस

पाटील पक्ष प्रवेश करावा की काँग्रेसमध्येच रहावेत, यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. विविध ठिकाणी बैठक घेत आहेत. यामध्ये राधानगरी तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेससोबत राहण्याबाबत विनंती केली, तर इतर सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी ‘राहुल पाटील सांगतील तसं’ असा पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. राहुल पाटील यांनी करवीर, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यासह बैठक घेतल्यानंतर राहुल पाटलांसोबत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

Rahul Patil
Harshal Patil : "फडणवीस अन् 2 डेप्युटींनी राज्याचं स्मशान केलंय..."; सांगलीतील कंत्राटदाराच्या आत्महत्येवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

राष्ट्रवादीचे ए.वाय पाटील यांच्यासोबत चर्चा

भोगावती सहकारी साखर कारखान्यात राहुल पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ए.वाय. पाटील देखील आहेत. भोगावती कारखान्याच्या निमित्ताने राधानगरी येथील बहुतांश कार्यकर्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ए.वाय. पाटील यांच्याशी देखील चर्चा केली. पाटील यांनी देखील राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले जाते.

राधानगरी तालुक्यातीलकार्यकर्त्यांनीही जो राहुल पाटील निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत अशा शब्दात भूमिका व्यक्त करताना दिसत आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये थांबयला सांगितले तर थांबायची आणि पक्षांतर करा म्हणाले तर पक्षांतर करण्याची आपली तयारी आहे. मात्र, हे करत असताना खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत निश्चितपणे चर्चा करणार आहे. असे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com