Kolhapur News, 04 Apr : इचलकरंजी (Ichalkaranji) येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक तीन महिन्यांपूर्वी बिनविरोध झाली होती. या निवडी विरोधात रत्नाप्पा कुंभार यांच्या कन्या रजणीताई मगदूम यांनी केंद्रीय सहकार निवडणूक असोसिएशनकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत ही निवडणूक (Election) बरखास्त करत बिनविरोध करण्यात आलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. मगदूम गटाच्या कार्यकर्त्यांनी कारखानास्थळी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तर आता नव्याने निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याची नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय सहकार खात्याने दिले आहेत. नव्या आदेशानुसार कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम 29 एप्रिलला सुरू होणार असून, 11 मे रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान केंद्रीय खात्याच्या या आदेशामुळे बिनविरोध स्थापन केलेल्या सत्तारूढ पी.एम. पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवाय रत्नाप्पा कुंभार यांच्या कन्या रजनीताई मगदूम यांना सहकार खात्याच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. 3 महिन्यापूर्वी या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती.
मात्र, यावेळी रजनीताई मगदूम, अशोक पाटील, अण्णासाहेब शहापुरे यांच्यासह त्यांच्या गटाच्या उमेदवारांचे अर्ज सूचक, अनुमोदक यांचा ऊस आलेला नाही, सर्वसाधारण सभेला अनुपस्थिती आदी कारणांमुळे बाद ठरवले होते. केंद्रीय सहकार कायद्यात अशी तरतूद नसल्याचे कारण देत यावर केंद्रीय सहकार खात्याकडे संबंधितांनी रजनीताई मगदूम यांनी दाद मागितली होती.
या तक्रारीची दखल घेत केंद्रीय सहकार खात्याकडून पंचगंगा सहकारी कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश दिले आहेत. नुकतीच झालेली निवडणूक बेकायदेशीर होती. चुकीच्या पद्धतीने विरोधकांचे अर्ज बाद ठरवले होते.
त्याची केंद्रीय सहकार खात्याने दखल घेत संचालक मंडळ बरखास्त केले. हा सभासदांचा विजय आहे. येणाऱ्या निवडणुकीत सभासद चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर असा निश्चितच न्याय देतील. अशी प्रतिक्रिया कारखान्याच्या माजी अध्यक्ष रजनीताई मगदूम यांनी दिली आहे.
सभासदांच्या विश्वासावरच आम्ही निवडणूक लढवली होती. फेरनिवडणूक हा तांत्रिक मुद्दा आहे. अनेक वर्षे आम्ही कारखान्याचा कारभार सुरळीत चालवला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला सभासदांच्या विश्वासावरच सामोरे जाऊ. सभासद मोठ्या मताधिक्यांनी आम्हाला विजयी करतील असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी व्यक्त केला आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.