Pandharpur News : पैसे घेऊन विठ्ठलाचे 'VIP' दर्शन देणं भोवलं, पंढरपुरात शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Pandharpur Vitthal Mandir News : पंढपुरातील श्री विठ्ठल मंदिरात वेळोवेळी दर्शनाचा काळाबाजार झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत मंदिर प्रशासन गंभीरतेने लक्ष देणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
 Sumit Shinde
Sumit Shindesarkarnama
Published on
Updated on

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक बाब रविवारी समोर आली आहे. भाविकांककडून पैसे घेऊन विठ्ठलाचे 'व्हीआयपी' पदस्पर्श दर्शन घडवून देणाऱ्या एका फूल विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित शिंदे, असं पैसे घेऊन दर्शन घडविणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे. सुमित शिंदे हा शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी आहे.

याप्रकरणी चेतन शशिकांत कबाडे ( रा. वाशिंद खातवाली, ता. शहापूर. जि. ठाणे ) असे फिर्याद दाखल केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेमुळे विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळाबाजार अजूनही सुरू असल्याचं दिसून येत आहे.

शहापूर तालुक्यातील चेतन कबाडे हे आपल्या कुटुंबासमवेत श्री. विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी रविवारी दुपारी पंढरपुरात आले होते. गर्दी असल्यानं दर्शनासाठी वेळ लागणार होता. त्यामुळे लवकर दर्शन मिळण्याची सुविधा कुठे आहे का? याची चौकशी कबाडे यांनी केली. तेव्हा, संत ज्ञानेश्वर मंडपाजवळ एक फूल विक्रेता आहे, त्याकडून दर्शन मिळेल, अशी माहिती मिळाली.

 Sumit Shinde
Abhijeet Patil : अभिजीत पाटलांचं ठरलं; माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवणार, पक्ष अद्यापही गुलदस्त्यात

त्यानंतर कबाडे हे दर्शन मंडपाजवळ आले आणि फूल विक्रेत्याकडे चौकशी दर्शनाची चौकशी केली. त्यावर दर्शनासाठी चार हजार रूपयांचा 'रेट' फूल विक्रेत्यानं सांगितला. त्याची पावती मिळेल, असं आश्वासनंही दिलं. आम्हालाही वरपर्यंत पैसे द्यावे लागतात, असे सांगून कबाडे यांच्याकडून संशयित आरोपी सुमित याने आपल्या मोबाईलवरील स्कॅनरवर कबाडे यांच्याकडून चार हजार रूपये घेतले.

यावेळी पावतीची मागणी केली असता, तुम्ही बाहेर दर्शन करून, या तुम्हाला पावती देतो, असं सुमितनं सांगितलं. दर्शन घेऊन आल्यानंतर कबाडे यांनी सुमितचा शोध घेतला असता, तो दिसून आला नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर कबाडे यांनी पैसे घेऊन विठ्ठलाचे दर्शन दिल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर सुमित शिंदेवर पैसे घेऊन विठ्ठलाचे दर्शन घडविल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी सुमित शिंदेवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यासह दोन सुरक्षारक्षकांना निलंबित केल्याची माहिती मिळत आहे.

 Sumit Shinde
Samadhan Avtade : आमदारकीपेक्षा विधानसभा चालविण्याचा आनंद अविस्मरणीय होता; समाधान आवताडे

खासगी सुरक्षारक्षकाला हातानं खुनावलं अन् त्यानं दर्शनास सोडलं

दर्शन मंडपात गेल्यावर एक गेट होते. तिथे निळ्या रंगाच्या खासगी गार्ड उभा होता. त्यावेळेस सुमित शिंदे याने त्या सुरक्षारक्षकास आत सोड, असं खुनावलं. त्यानंतर आम्हाला दर्शनास सोडलं, असं कबाडे यांनी सांगितलं.

या घटनेमुळे सुमित शिंदे हा एक मोहरा हाती लागला आहे. असे अनेक मोहरे मंदिर परिसरात असण्याची शक्यता आहे. यात मंदिर समितीतील किती सुरक्षारक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांचा हात आहे? यात किती पैशांची उलाढाल झाली आहे? अशा दलालांवर काय कारवाई करणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. याकडे सरकार, जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासन गंभीरतेने पाहणार आहे की नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. याबाबत आम्ही विठ्ठल मंदिर समितीतील अधिकारी मनोज श्रोत्री यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com