Kolhapur Politics : शरद पवार गटाची सभा मुश्रीफ कार्यकर्त्यांना झोंबली, जिल्हा बँकेच्या आरोपावरून वाद पेटला

Hasan Mushrif Vs Sharad Pawar NCP : शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील यांनी आपल्या भाषणात जिल्हा बँकेत पालकमंत्र्यांचा भ्रष्ट्राचार सुरू असल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर दोन्ही राष्ट्रवादीमधील वाद पेटला आहे.
Hasan Mushrif Vs Sharad Pawar NCP
Hasan Mushrif Vs Sharad Pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 10 Sep : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कागलमधील सभा पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या गटाला चांगलीच झोंबल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील यांनी आपल्या भाषणात जिल्हा बँकेत पालकमंत्र्यांचा भ्रष्ट्राचार सुरू असल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर दोन्ही राष्ट्रवादीमधील वाद पेटला आहे.

जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी व्ही. बी पाटलांच्या आरोपाला उत्तर देत पलटवार केला आहे. त्याला देखील व्ही.बी पाटील (V.B Patil) यांनी प्रत्युत्तर देत कागलमध्ये परिवर्तन घडवण्याचा इशारा दिला आहे. यावर मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांकडून उत्तर येणं म्हणजे, पाटलांना मुश्रीफ घाबरल्याचा पुरावाच आहे, असा टोला लगावला आहे.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांचा पक्षप्रवेश कागलमधील गैबी चौकात झाला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार, (Sharad Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्षांनी आपल्या भाषणात पालकमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा बँकेत भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला होता.

Hasan Mushrif Vs Sharad Pawar NCP
Manoj Jarange Patil : जरांगे-पाटलांचे पुन्हा 'उपोषणास्त्र', तारीखही ठरली; विधानसभेचं गणित बदलणार?

त्यांचा हा आरोप मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांना चांगला झोंबला आहे. पाटील यांनी भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करावेत अन्यथा त्यांच्या बंगल्यासमोर आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी दिला होता. तसेच व्ही. बी पाटील यांना कागल तालुक्याबद्दल आणि जिल्हा बँकेबद्दल कायमच द्वेष असल्याचा आरोप माने यांनी केला होता.

त्यावर आता जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील यांनी पलटवार करत पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह कार्यकर्त्यांना माझी टीका झोंबली आहे. माझ्यावर टीका म्हणजे मुश्रीफ घाबरले असल्याचा पुरावा आहे. शिवाय भ्रष्टाचारी आणि गद्दारी गाडण्यास आमचं प्राधान्य आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक जण तुमचे हिशोब चुकते करणार आहेत. भैय्या माने हे देखील तुमच्या सोबत राहतील का? हा खरा प्रश्न असून जिल्हा बँकेत मुश्रीफ यांनी काय उद्योग केले? कोणाचे खिसे भरले? याचा पाढा लवकरच वाचणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

Hasan Mushrif Vs Sharad Pawar NCP
Kirit Somaiya : 'ओ फिर से आ रहा है'; भाजपचा हा भिडू पुन्हा मैदानात

कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) विरुद्ध समरजीत घाटगे अशी संभाव्य लढत निश्चित आहे. मात्र ही निवडणूक मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना केवळ घाटगे यांनाच तोंड द्यावे लागणार नाही. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, यांच्यासह निष्ठावंत कार्यकर्त्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com