Pandharpur Politics : पंढरपूरचे नेते लागले आमदारकीच्या तयारीला...जनतेसाठी मोबाईल नंबरही जाहीर केला!

Assembly Election 2024 : पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके हे इच्छूक आहेत.
Abhijeet Pati-Bhagirath Bhalke-Prashant Paricharak
Abhijeet Pati-Bhagirath Bhalke-Prashant ParicharakSarkarnama

Mangalvedha, 13 June : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते विधानसभेच्या तयारी लागले आहेत. पंढरपूर (Pandharpur) विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी 24 तास 365 दिवस जनतेसाठी उपलब्ध असे सांगत आपला मोबाईल नंबर जाहीर केला आहे. दरम्यान, याबाबतची खात्री करण्यासाठी एका कार्यकर्त्याने चक्क आपल्या नेत्याला रात्री उशीरा फोन लावला. विशेष म्हणजे त्या नेत्याने फोनही घेतला आणि त्या कार्यकर्त्याने सहकाऱ्याबरोबर लावली पैजही जिंकला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात काँटे की टक्कर झाली. त्यात प्रणिती शिंदे यांनी ७४ हजार मतांच्या फरकानी राम सातपुते यांच्यावर विजय मिळविला. प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे यांनी भाजपचे मागील दोन खासदारांच्या कामांची चिरफाड केली होती. त्यातून त्यांच्यावर निष्क्रियतेचा शिक्का मारत भाजपवर हल्लाबोल केला होता.

पंढरपूर-मंगळवेढ्यातील (Pandharpur-mangalvedha) पाणी प्रश्न, दुष्काळी मदत आणि इतर प्रश्नांवर आवाज उठविला होता. त्या तुलनेत मतदारसंघातील आमदार भाजपचा असूनही प्रचारात प्रणिती शिंदे ह्याच आक्रमक दिसून येत होत्या. त्याचा परिणाम म्हणून मागील दोन निवडणुकांप्रमाणेच याही निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पंढरपूर-मंगळवेढ्यातून तब्बल 45 हजारांचे मताधिक्य मिळाले हेाते.

लोकसभेच्या आतापर्यंतच्या निवडणुकीतील पंढरपूर-मंगळवेढ्यातून मिळालेले हे सर्वाधिक मताधिक्य ठरले आहे. त्यामुळे भाजप आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांच्या मतदारसंघात खळबळ उडाली आहे. त्यातूनच खडबडून जागे झालेल्या विधानसभा इच्छुकांच्या समर्थकांनी आतापासून तयारी सुरू केली आहे.

Abhijeet Pati-Bhagirath Bhalke-Prashant Paricharak
(Video) Praniti Shinde Pandharpur Tour : पहिल्याच कृतज्ञता मेळाव्यात भालके समर्थकांचा प्रणिती शिंदेंसमोर गोंधळ

विधानसभेची वाट सोईस्कर व्हावी, यासाठी पंढरपूरमधील नेत्यांच्या कट्टर समर्थकांनी जनतेसाठी आपला मोबाईल नंबर 24 तास 365 दिवस तुमच्या सेवेसाठी तत्पर असे सांगत नेत्याचा फोटो व मोबाईल नंबर देऊन जाहिरातबाजी करण्यास सुरुवात केली.

पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि महाविकास आघाडीकडून विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे इच्छूक आहेत. आता या नेत्यांच्या निकटवर्तीयांनी मोबाईल नंबर देत जनतेसाठी 24 तास 365 दिवस उपलब्ध असे म्हटले आहे.

Abhijeet Pati-Bhagirath Bhalke-Prashant Paricharak
(Video) Abdul Sattar Vs Raosaheb Danve : अब्दुल सत्तार कधी कोणाशी एकनिष्ठ राहिलेत, ते माझ्याशी राहतील; दानवेंनी निशाणा साधला

मंगळवेढ्यात 26 मे रोजी झालेल्या वादळी पावसात विजेचे खांब कोलमडून पडले आहेत. त्यातील काही वाड्या वस्त्या अजूनही अंधारात आहेत. त्याचवेळी पडझड झालेल्या ९०० घरमालकांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. यासह विविध प्रश्नांवर आवाज उठविण्याची आवश्यकता आहे, मात्र, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मौन बाळगून आहे.

गेल्या खरीपातील पीक विम्याची रक्कम अजून निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. गेल्या सप्टेंबरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीन दिवस प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यातील काही नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. पण, प्रत्यक्षात आंदोलनात सहभाग घेतला नव्हता. आता विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असताना जनतेसाठी 24 तास उपलब्ध असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर उडी घेतली आहे. मात्र हे नेते लोकांना भेडसवणाऱ्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणार का? हा खरा प्रश्न आहे.

Abhijeet Pati-Bhagirath Bhalke-Prashant Paricharak
(Video) Manoj jarange News : अंबादास दानवे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत एकाचवेळी जरांगेंच्या भेटीला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com