NCP Politic's : पवारांचा एक खासदार अन्‌ चार आमदारांचे अजितदादांशी गुफ्तगू; झेडपीबाबत झाला मोठा निर्णय

NCP SP MP & MLA Meet Ajit Pawar : महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असून अजित पवार यांच्या भेटीत रणनीती ठरली आहे.
NCP SP MP & MLA Meet Ajit Pawar
NCP SP MP & MLA Meet Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 January : महापालिकेतील नामुष्कीजनक पराभवानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार आमदार आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शनिवारी (ता. 17 जानेवारी) रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत झेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक एकत्रिपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचे पानीपत झाले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंद बागेतील भेटीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रिपणे लढण्याचा निर्णय झाला आहे. त्या भेटीला अजितदादांसह जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींसह प्रमुख नेते उपस्थित होते.

दोन्ही पवारांच्या शनिवारी सकाळच्या भेटीनंतर सायंकाळी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairsheel Mohite Patil), करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि मोहोळचे आमदार राजू खरे यांनी अजितदादांची भेट घेतली. यावेळी दोन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, वसंतराव देशमुख हेही उपस्थित होते.

या भेटीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ आणि पंचायत समितीच्या १३६ जागा एकत्रिपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागांचे वाटपही झाले आहे, ते योग्यवेळी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, भाजप सोडून इतर पक्षांसोबत युती आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांना देण्यात आलेला आहे, त्यामुळे त्या त्या गटातील संबंधित पक्षांची ताकद पाहून स्थानिक नेते आघाडी किंवा युतीचा निर्णय घेऊ शकतात.

ज्या जागांवर एकमत होणार नाही, त्या ठिकाणी दोन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांचे सदस्य एकत्र येणार आहेत, असेही या बैठकीत ठरलं आहे

NCP SP MP & MLA Meet Ajit Pawar
Mohite Patil : मोहिते पाटलांच्या मनात नेमकं काय? विजयदादा अन्‌ रणजितदादा भेटले फडणवीसांना, तर धैर्यशील अजितदादांना!

नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचा अकलूज वगळता इतरत्र प्रभाव दिसून आला नाही. कुर्डुवाडी नगरपरिषदेत माजी आमदार संजयमामा शिंदेंच्या नेतृत्वाखाली १३ नगरसेवक निवडून आले आहेत. मंगळवेढ्यात दोन, मोहोळमध्ये सर्व जागा ह्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढविण्यात आल्या होत्या.

NCP SP MP & MLA Meet Ajit Pawar
Solapur Politic's : जानकरांनी पालकमंत्र्यांचा डाव केला उघड : ‘अभिजीत पाटील, नारायण पाटलांवर गोरेंचा दबाव...आघाडी करून लढा; पण...’

सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला आहे, तर शरद पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही, त्यामुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com