Mohite Patil : मोहिते पाटलांच्या मनात नेमकं काय? विजयदादा अन्‌ रणजितदादा भेटले फडणवीसांना, तर धैर्यशील अजितदादांना!

Ranjitsinh Meet Fadnavis & Dhairsheel Meet Ajit Pawar : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील कुटुंबाच्या फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटींमुळे सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
Ranjitsinh Mohite Patil- Devendra Fadnavis-Dhairsheel Mohite Patil- Ajit Pawar
Ranjitsinh Mohite Patil- Devendra Fadnavis-Dhairsheel Mohite Patil- Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 January : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोलापूरच्या राजकीय क्षेत्रासाठी शनिवार (ता. १७ जानेवारी) मोठ्या घडामोडींचा ठरला. कारण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव, भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शनिवारी दुपारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, असा सवाल राजकीय वर्तुळातून चर्चिला जात आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व असे यश मिळविले आहे. सोलापूर (Solapur) महापालिका निवडणुकीत विरोधातील सर्व राजकीय पक्षांना भाजपने जमिनीवर आणले आहे. भाजपला ऐतिहासिक अशा ८७ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे अनेकांना पोटात राजकीय गोळा आला आहे. अनेकांची पावले कमळाकडे वळताना दिसून येत आहेत.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर घराणे असलेल्या मोहिते पाटील कुटुंबातील रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) हे भाजपचे आमदार आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून ते पक्षापासून जरा लांब असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. माजी आमदार राम सातपुते यांनी त्यांच्यावर कारवाईसाठी आग्रह धरला आहे. मात्र, पक्षाने अजून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पण अकलूज नगरपालिकेची निवडणूक सातपुते यांच्या नेतृत्वात भाजपने लढवली होती.

त्या वेळी आमदार रणजितसिंह यांनी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना भेट मिळू शकली नव्हती. मात्र, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी विजयदादा आणि रणजितदादा यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात फडणवीसांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे कारण समजू शकले नाही. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची पार्श्वभूमी त्यामागे असू शकते.

Ranjitsinh Mohite Patil- Devendra Fadnavis-Dhairsheel Mohite Patil- Ajit Pawar
Solapur Politic's : जानकरांनी पालकमंत्र्यांचा डाव केला उघड : ‘अभिजीत पाटील, नारायण पाटलांवर गोरेंचा दबाव...आघाडी करून लढा; पण...’

रणजितसिंह यांच्या आमदारकीची मुदत येत्या काही महिन्यांत संपणार आहे. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोहिते पाटील-फडणवीस यांच्या भेटीला महत्व आहे.

दरम्यान, एकीकडे विजयदादा आणि रणजितदादा हे शनिवारी दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी रणजितदादांचे बंधू माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे मोहिते पाटलांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Ranjitsinh Mohite Patil- Devendra Fadnavis-Dhairsheel Mohite Patil- Ajit Pawar
Sawant Family Dispute : ‘माझ्या भाजप प्रवेशाला भावकी आडवी आली; मुख्यमंत्र्यांना सांगून प्रवेश रोखला’ : तानाजी सावंतांवर भावाचा गंभीर आरोप

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात बारामतीत गोविंद बागेत शरद पवार, अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षातील महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली, त्यामुळे झेडपी निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील यांच्या या भेटीगाठींना महत्व आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com