Shashikant Shinde : पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या घराची पोलीस कर्मचाऱ्याकडून रेकी; कार्यकर्ते आक्रमक

Illegally Raided House : आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या आठवड्यात देण्यात आली आहे. त्यानंतर कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने त्यांच्या घराची केलेली पाहणी हा धक्कादायक प्रकार मानला जात आहे.
Shashikant Shinde
Shashikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara, 25 July : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील निवासस्थानाची कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने बेकायदेशीररित्या पाहणी (रेखी) केल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, कोरेगाव पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने अखेर शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव साहिल शिंदे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक तुषार जोशी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या आठवड्यात देण्यात आली आहे. त्यानंतर कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्या घराची केलेली पाहणी हा धक्कादायक प्रकार मानला जात आहे. त्यावरून राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

आमदार शशिकांत शिंदे यांचे कोरेगाव (Koregaon) तालुक्यातील ल्हासुर्णे येथे घर आहे. कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता आमदार शिंदे यांच्या ल्हासुर्णे येथील निवासस्थानी प्रवेश करून घराची पाहणी केल्याचे उघडकीस आले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यावरून शिंदे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.

नियमानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरी जात असताना संबंधितांना त्याबाबतची कल्पना देणे आवश्यक असते किंवा तसा पत्रव्यवहार तरी संबंधित लोकप्रतिनिधीशी केला जातो. मात्र, अशी कोणतीही पूर्वकल्पना न देता कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णे येथील घराची पाहणी केल्याचे उघड झाले आहे.

Shashikant Shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे पंढरपुरात मोठे विधान; म्हणाले ‘आमचा अजेंडा खुर्ची नाही, तर...’

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून शशिकांत शिंदे यांच्या बदनामीचे प्रयत्न सुरू आहेत. व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असून कोरेगाव पोलीस ठाण्यात एकतर्फी कामकाज चालत असून तेथील कर्मचारी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे चौकशी करण्याचे कामकाज करत आहेत, असा आरोप आमदार शिंदे समर्थकांकडून केला जात आहे.

ल्हासुर्णे येथील शिंदे यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार चिचित्र झाला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.

Shashikant Shinde
Harshal Patil Suicide : गुलाबराव पाटलांच्या विधानावर हर्षल पाटलांच्या भावाची प्रतिक्रिया; ‘माझ्या तोंडून वाईटही येऊ शकतं. पण...’

एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे पोलिसांची वागणूक

कोरेगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने कोणतीही कल्पना न देता घराची पाहणी केल्याने शशिकांत शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. एखाद्या राजकीय पक्षाने दिलेल्या निर्देशानुसार पोलिस सध्या काम करीत आहेत, त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोमवारी कोरेगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे, त्या मोर्चात मी स्वतः सहभागी होणार आहे. संबंधितावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com