
Sangli, 24 July : जलजीवन मशिनमध्ये केलेल्या कामाचे बिल न मिळाल्याने सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील तरुण ठेकेदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतर सरकारवर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. पण राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलंच काम नाही, असे विधान केले होते. त्यावरही सांगलीतून प्रतिक्रिया येत असून हर्षल पाटील यांच्या चुलत बंधूने तर आमच्या तोंडून वाईटही येऊ शकतं. पण आम्ही आमच्यावर ओढावलेल्या दुःखाचे भाव ठेवून बोलत आहे, असे म्हटले आहे.
हर्षल पाटील (Harshal Patil) यांनी सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा आणि पाणी टाकीचे काम केले आहे. पण सरकार दरबारी अनेकदा हेलपाटे मारूनही बिल मिळत नसल्याने ठेकेदार हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यावरून राज्यातील विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबत बोलताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलचं काम नाही. या योजनेतील कुठलंही बिल पेडिंग नाही, त्यांनी सबकॉन्ट्रॅक्ट घेतलं असेल, असं म्हटलं होतं. त्यावर आता हर्षल पाटील यांच्या भावाने गुलाबराव पाटील यांना चांगलेच सुनावले आहे. हर्षल पाटील यांनी सबकॉन्ट्रॅक्ट घेतलं म्हणजे तुमचं काम केलं आहे ना? त्याने तुमचं काम पूर्ण केलं आहे ना? त्याचं बिल सरकारच देणार ना?
जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे बिल न मिळाल्यामुळे आमच्या भावाचा बळी गेला आहे. गुलाबराव पाटील जर हे असे असंवेदनशील वक्तव्य करून आमच्या जखमेवर मीठ चोळणार असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील होण्याऐवजी ‘तुम्ही आम्हालाच म्हणत असाल की तो ठेकेदार नव्हता. अनेक ठेकेदार सबकॉन्ट्रॅक्ट देतात, ते कशाच्या आधारे देतात. अनेक उपठेकेदार आज महाराष्ट्रात काम करत आहेत. हर्षल पाटील यांनी काम केले नाही, ते तुम्ही बघायला आला होता का? तुम्ही हवेत आहात. गावात येऊन विचारलं असतं की, जलजीवनचे काम कोणी केली तर लहान मुलंही सांगेल की हे काम हर्षल पाटील यांनी केले आहे.
गुलाबराव पाटील म्हणतात की, तो यादीतील ठेकेदार नाही, तो सबकॉन्ट्रॅक्टर असला तरी त्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं ना? हर्षल पाटील यांनी काम केले आहे ना, ते बघा तुम्ही. गुलाबराव पाटील यांनी जबाबदारी झटकून आमच्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. माझ्या तोंडातून वाईटही येऊ शकतं. पण मी दुःखाचं भान ठेवून मी बोलतोय, अशी भावना हर्षल पाटील यांच्या भावाने व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.