Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे पंढरपुरात मोठे विधान; म्हणाले ‘आमचा अजेंडा खुर्ची नाही, तर...’

Sant Shri Namdev Maharaj Award : आषाढी वारीच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्या दिवशी नामदेव पायरी आणि मुखदर्शन घेऊन गेले होते. मात्र, आज एकनाथ शिंदे यांनी गाभाऱ्यात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 24 July : आम्ही टीम म्हणून काम करतो. पदं वर-खाली होत असतात. पण, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस आणणे, हा आमचा अजेंडा आहे. राज्याच्या विकासाचा आमचा अजेंडा आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही, तर ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसविले आहे, त्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांचे प्रश्न शोधणे आणि त्याचे निराकरण करणे, हा आमचा अजेंडा आहे, असे शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार (Sant Shri Namdev Maharaj Award) देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला. संत नामदेव महाराजांच्या वंशजांकडून पंढरपुरातील संत नामदेव महाराज मंदिरात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरम्यान, आषाढी वारीच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्या दिवशी केवळ नामदेव पायरी आणि मुखदर्शन घेऊन गेले होते. मात्र, आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गाभाऱ्यात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी आमचा अजेंडा खुर्ची नसून सर्वसामान्यासाठी काम करणे हे आहे, असेही नमूद केले.

एकनाथ शिंदे म्हणाले, वारकऱ्यांना त्रास, त्यांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही आषाढी वारीच्या दिवशी पांडुरंगाचे केवळ मूकदर्शन घेऊन गेलो. पण आज पांडुरंगाच्या समोर बसण्याचा योग मिळाला, संधी मिळाली. आम्ही व्हीआयपी नसून वारकरी आहे. आम्ही पंढरपूरला व्हीआयपी म्हणून नव्हे; तर वारकरी म्हणून येतो. वारकारी संप्रदायची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे.

Eknath Shinde
Harshal Patil Suicide : गुलाबराव पाटलांच्या विधानावर हर्षल पाटलांच्या भावाची प्रतिक्रिया; ‘माझ्या तोंडून वाईटही येऊ शकतं. पण...’

आमचं महायुती सरकारचं हे सर्वसामान्य जनतेमध्ये आमूलाग्र बदल घडविणारे आहे. आम्ही टीम म्हणून काम करतो. पदं वर-खाली होत असतात. पण, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस आणणे, हा आमचा अजेंडा आहे. राज्याच्या विकासाचा आमचा अजेंडा आहे, त्यामुळे प्रत्येक जण काम करत आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही, तर ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसविले आहे, त्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांचे प्रश्न शोधणे आणि त्याचे निराकरण करणे, हा आमचा अजेंडा आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde
Satej Patil : सतेज पाटील यांच्या लाल दिव्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या हाती; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी हालचालींना वेग

एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही मित्रपक्ष म्हणून हातात हात घालून काम करत आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली भाडेवाढ तातडीने रद्द करण्याची सूचनाही त्यांना केलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com