Sanjay Raut : राऊत,फ्युत यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही, सुनील शेळकेंनी दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम

Sanjay Raut Vs Sunil Shelke : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर खाणी आणि उत्खनन प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.
Maval constituency MLA Sunil Shelke And MP Sanjay Raut
Maval constituency MLA Sunil Shelke And MP Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील मावळ मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे. येथे खासदार संजय राऊत यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. तर राऊत यांनी शेळके यांच्यावर शासनाची हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी थकवल्याचा गंभीर आरोप केल्याने चर्चेही सुरू झाली आहे. यामुळे आता शेळके यांनी देखील या आरोपांना उत्तर दिलं आहे. (Sanjay Raut accuses MLA Sunil Shelke of withholding thousands of crores in government royalty dues in Maval constituency)

राऊत यांनी मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर खाणी आणि उत्खनन प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. "देवेंद्रजी, महाराष्ट्रातील लुट थांबवा," अशा शब्दांत त्यांनी पत्रात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राऊत यांच्या आरोपानुसार, शासनाची अधिकृत परवानगी न घेता आमदार शेळके (MLA Sunil Shelke) यांनी आंबळे गावातील खाणजमिनींवर मोठ्या प्रमाणात दगड व खनिजांचे उत्खनन केले. त्यातून मिळणारी रॉयल्टी शासनाकडे न भरल्याने सरकारला हजारो कोटी रुपयांचा आर्थिक तोटा झाल्याचा दावा त्यांनी केला. या उत्खननामुळे जमिनीत सुमारे 100 फूट खोल खड्डे निर्माण झाले आहेत.

Maval constituency MLA Sunil Shelke And MP Sanjay Raut
Sanjay Raut Vs Sunil Shelke : संजय राऊतांच्या टार्गेटवर सुनील शेळके, 'त्या' प्रकरणात कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सुनील शेळके म्हणाले, संजय राऊत यांनी केलेला आरोपामागे त्यांची मनात कोणती सल आहे. अद्याप हे मला समजलेलं नाही. पादचारी पूल पडून झालेल्या अपघातानंतर त्या ठिकाणी सरकार कुठे आहे? स्थानिक आमदार काय करतात? असा देखील आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्या पुलाच्या कामासाठी आठ कोटींची तरतूद केली असताना देखील संजय राऊत यांनी वेगवेगळी विधान करत तथ्य नसलेले आरोप केले होते.

त्यानंतर आता जे काही संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. ते कोणतेही पुरावे नसताना केले आहेत. हे देखील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा शेळके यांनी केला आहे. तसेच याबाबत त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी मला लेखी स्वरूपात द्यावेत. ज्यावेळेस लेखी स्वरूपात राऊत याबाबत पुरावे देतील त्यानंतरच मी या गोष्टींचा खुलासा करेल असंही शेळके यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

तसेच राऊत यांना लेखी स्वरूपात पुरावे देण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आपण त्यांच्या उत्तराची वाट पाहू अन्यथा... असाही इशारा त्यांनी दिला आहे. तसेच राऊत हे सातत्याने बिन बुडाचे आरोप करत असतात. त्यामुळे त्यांनी याबाबत तरी ठोस असे पुरावे द्यावेत अशी माझी मागणी असणार आहे.

संजय राऊत यांनी राजकीय दृष्टिकोनातून सूटबुद्धीचा राजकारण न करता. अथवा एखाद्याच्या कुटुंबावर आणि व्यवसायावर न जाता राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने करणे आवश्यक असून त्यांच्याकडे आरोपात संदर्भात पुरावे असतील तर त्यांनी ते माध्यमातून जनतेसमोर आणले पाहिजेत असं शेळके म्हणाले.

Maval constituency MLA Sunil Shelke And MP Sanjay Raut
Sanjay Raut : राज यांचा लिहिलेला राजीनामा, मविआची बांधणी अन् ठाकरे बंधूंसाठी लावलेला जोर; राऊत बदलताहेत महाराष्ट्राचं राजकारण

शेळके पुढे म्हणाले, राऊत-फ्युत सारख्या अनेकांनी माझ्यावर आरोप केले आहेत. त्यांना मी महत्त्व देत नाही. मात्र गेले वीस वर्ष माझं कुटुंब व्यवसाय करत आहेत. अशा प्रकारचे राजकारणकरून काहींचा डाव करण्याचा हेतू असेल तर तो आम्ही हाणून पाडू असाही दम शेळके यांनी भरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com