Sanjay Raut : राज यांचा लिहिलेला राजीनामा, मविआची बांधणी अन् ठाकरे बंधूंसाठी लावलेला जोर; राऊत बदलताहेत महाराष्ट्राचं राजकारण

Sanjay Raut : हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरुन सध्या राज्याच्या राजकारणात नवे वारे देखील वाहायला लागले आहेत. यामध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची प्रचंड चर्चा सुरु आहे.
Sanjay Raut_Uddhav Thackeray_Raj Thacekray
Sanjay Raut_Uddhav Thackeray_Raj Thacekray
Published on
Updated on

Sanjay Raut to change Maharashtra Politics : हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरुन सध्या राज्याच्या राजकारणात नवे वारे देखील वाहायला लागले आहेत. यामध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची प्रचंड चर्चा सुरु आहे. अनेकांना वाटतं की ते एकत्र येणार नाहीत, पण मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते मात्र उद्धव आणि राज ठाकरे कधी एकत्र येतात याची आस लावून बसले आहेत. दोघांच्या एकत्र येण्याचे चौकाचौकात फ्लेक्स लावणं असेल किंवा दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना मिठाई भरवणं असोत, हे सर्वकाही करुन झालं आहे. पण या सर्व घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका असणारेय ती साक्षात खासदार संजय राऊत यांची.

Sanjay Raut_Uddhav Thackeray_Raj Thacekray
Pune Weapon license: स्टेट्ससाठी बंदुकीचं लायसन्स आता विसरा! पोलीस आयुक्तांचा दणका, नेमकं काय घडलंय?

एकीकडं शिवसेनेतून बाहेर पडलेल्या प्रत्येकानं संजय राऊतांना बोल लावून शिवसेना फुटीसाठी जबाबदार धरलं! पण दुसरीकडं संजय राऊतांनी महाविकास आघाडीतल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणण्याचं शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं. त्यानंतर आता राज आणि उद्धव या दोन्ही चुलत भावांच्या मनोमिलनासाठी देखील प्रयत्नशील आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? राज ठाकरेंचं शिवसेना सोडायचं निश्चित झालं आणि त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना शिवसेनेच्या पदांचा राजीनामा लिहून देणारे संजय राऊतचं होते. राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहून दिला हे खुद्द बाळासाहेब ठाकरेंनीही ओळखलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या आपण जवळचे होतो आणि आजही आपले त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असं संजय राऊत सांगतात.

Sanjay Raut_Uddhav Thackeray_Raj Thacekray
महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश मीना कोण आहेत? भाजपशी आहे खास कनेक्शन

पण यंदा खरोखरच राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्यात अर्थात त्यांच्या दोन्ही पक्षांमध्ये युती घडवून आणण्यात संजय राऊत यशस्वी ठरतात का? यासाठी ते काय स्ट्रॅटेजी वापरतात? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे. त्यांच्या स्ट्रॅटेजीबाबत काही महत्वाची निरिक्षणंही सांगता येतील. ५ जुलै रोजी होणारा हिंदी सक्तीविरोधातला मोर्चा आणि आता हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर निघणारा विजयी मोर्चा, याची स्क्रीप्ट संजय राऊत यांचीच. दरम्यान, आदित्य ठाकरे आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी थांबून आवर्जुन घेतलेली भेट तर ठाकरेंच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची देशपांडेंसोबत रेस्तराँमध्ये झालेली पूर्वनियोजित भेट.

Sanjay Raut_Uddhav Thackeray_Raj Thacekray
Maharashtra Congress: विधानसभेला 75 लाख मतदार वाढले, काँग्रेसनं उचललं मोठं पाऊल! मतदार याद्यांबाबत घेतला मोठा निर्णय

तसंच संजय राऊत यांनी नुकतेच राज-उद्धव एकत्र येण्याचे संकेतही दिले. हिंदी सक्तीचा जीआर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे घेतल्यानंतर राऊत म्हणाले होते की, "आम्ही जेव्हा जेव्हा सोबत येऊ तेव्हा तुम्हाला मागे हटावं लागेल. आता पाहात राहा महाराष्ट्रात पुढे काय काय होतंय! कारण महाराष्ट्रात ठाकरे एक ब्रँड आहे, त्यांनी एकत्र आलं पाहिजे. बाकी कोणी एकत्र आलं नाही तरी चालेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्राच्या दुश्मनाशी लढता येणार नाही. हे ठाकरे ब्रँड आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे. बाकी कोणी एकत्र नाही आले तरी चालेल, लोकांची हीच भावना आहे. शिवसेना मनसेला सोबत घ्यायला तयार नाही, असं एक परसेप्शन तयार झालंय, पण जेव्हा एका मुलाखतीतून राज ठाकरेंनी ऐक्याची साद घातली तेव्हा त्याला दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी प्रतिसादही दिला, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

या सर्व ताज्या घडामोडींवरुन संजय राऊतांकडून दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाचे प्रयत्न अन् पर्यायानं महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारं चित्रही दिसून येतंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com