Sangli Crime : पंचायत समितीच्या अभियंत्याचा गूढ मृत्यू? नातेवाईकांचा राजकीय व्यक्तीच्या स्वीय सहायकासह अधिकाऱ्यावर आरोप

Sangli Jat Panchayat Samiti Engineer Found Dead : सांगली जिल्ह्यातील जत पंचायत समितीकडील एका शाखा अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह कृष्णा नदीवरील नव्या पुलाजवळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Panchayat Samiti Engineer Avdhut Wadar
Panchayat Samiti Engineer Avdhut Wadarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. इस्लामपूर येथील 27 वर्षीय शाखा अभियंता अवधूत वडार याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.

  2. तो जत पंचायत समितीतील शाखा अभियंता म्हणून कार्यरत होता

  3. वडार याच्या नातेवाईकांनी राजकीय पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायक आणि पंचायत समिती अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

Sangli News : सांगली जिल्ह्यात पंचायत समितीकडील शाखा अभियंत्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह कृष्णा नदीवर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नव्या पुलाजवळ सापडला असून अवधूत अशोक वडार (वय 27, रा. इस्लामपूर) असे पंचायत समितीकडील शाखा अभियंत्याचे नाव आहे. तर हा मृत्यू बुडून मृत्यू झाल्याचे शासकीय रुग्णालयातील उत्तरीय तपासणीत उघड झाले आहे. मात्र हा घातपात असल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. मात्र तो रात्री ताब्यात घेण्यात आला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. धक्कादायक म्हणजे वडार याच्या नातेवाईकांनी एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायकासह पंचायत समितीतील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, इस्लामपूर येथील अवधूत वडार हे जत पंचायत समितीमध्ये शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. दरम्यान ते सहा महिन्यांपासून तणावात होते, त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव होता. याच तणावात ते काल नोकरीवर गेले होते. परंतू ते सायंकाळी उशिरा घराकडे परतले नाहीत.

ज्यानंतर नातेवाईक त्यांचा शोध सुरू केला. पण रविवारी (ता.14) सकाळी बायपास रस्त्यावरील पुलाखाली मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत मृतदेह जत येथे कार्यरत अवधूत वडार यांचा असल्याचे समोर आले. याची माहिती इस्लामपूर व जत येथील नातेवाइकांना पोलिसांनी दिली. तसेच वडार यांचा मृतदेह पंचनाम्यानंतर शासकीय रुग्णालयात पाठवल्यानंतर वडार यांचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Panchayat Samiti Engineer Avdhut Wadar
Sangli Crime : सांगली सुन्न! बापानेच मुलीचा घेतला बळी, तर 16 वर्षीय विद्यार्थिनीने केली आत्महत्या; आता पोलिसांची कसोटी

दरम्यान वडार यांच्या नातेवाईकांनी अवधूत यांच्या मृत्यूनंतर अवधूत यांच्यावर दबाव होता. ते तणावाखाली होते. त्याच्यावर पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दबाव होता. एका राजकीय पदाधिकाऱ्याचा स्वीय सहायक तसेच काही राजकीय मंडळींनी वेळोवेळी त्यांना त्रास दिला. यामुळे, अवधूत यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप वडार यांच्या नातेवाईकांनी केला.

तसेच जोपर्यंत या राजकीय पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायकासह त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. पण पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Panchayat Samiti Engineer Avdhut Wadar
Sangli Crime : 'डॉक्टर' व्हायचं होतं तिला… पण सराव चाचणीनं केला घोळ! चिडलेल्या बापाची अमानुष मारहाण; 17 वर्षांच्या लेकीचा मृत्यू!

FAQs :

प्र.1: मृत अभियंत्याचे नाव काय?

उ.1: अवधूत अशोक वडार असे मृत अभियंत्याचे नाव असून तो 27 वर्षांचा होता. तर तो इस्लामपूरचा होता

प्र.2: वडारचा मृतदेह कुठे सापडला?

उ.2: मृत अभियंता अवधूत वडार याचा मृतदेह कृष्णा नदीवरील नव्या पुलाजवळ सापडला.

प्र.3: नातेवाईकांनी नेमकी मागणी काय?

उ.3: वडार याचा मृत्यू राजकीय पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायक व पंचायत समिती अधिकारी यांच्या दबावामुळे झाला आहे. त्यामुळे संबंधितावर वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com