
विटा गणेशोत्सवाच्या आरतीत जयंत पाटील, विशाल पाटील यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.
खानापूर-आटपाडी मतदारसंघातील राजकीय वातावरण या आरतीतून तापले.
सुहास बाबर यांनी महायुतीला संदेश दिला की ‘‘आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढणार.’’
या आरतीमुळे स्थानिक पातळीवरील निवडणूक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
Sangli News : विट्यात गणेशोत्सवाच्या आरतीत राजकारणाची झलक पाहायला मिळत आहे. येथील विट्याच्या राजाच्या आरतीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांची उपस्थिती लागल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. तर आमदार सुहास बाबर, अमोल बाबर यांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. हा आरती सोहळा खानापूर, आटपाडी तालुक्यातील राजकीय वातावरण तापणारा ठरला आहे. तर महायुतीला आगामी निवडणुकांत ‘आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू’ असा संदेशच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर देताना दिसत आहेत.
महात्मा गांधी विद्यामंदिराच्या मैदानावर विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागचा राजाच्या धर्तीवर विट्याच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. भव्यदिव्य असा गजमहल साकारला असून आज (ता.6) विसर्जनाच्या आधी सकाळी आरतीला आमदार जयंत पाटील यांच्यासह खासदार विशाल पाटील यांनी हजेरी लावली.
यावेळी आमदार सुहास बाबर व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भव्य मांडणी, देखावा, गजमहल पाहून आमदार पाटील यांनी बाबर बंधूंचे तोंड भरून कौतुक केले. सुहास बाबर हे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार असले तरी खानापूर, आटपाडी तालुक्यात महायुतीच्या नेत्यांकडून त्यांची घेराबंदी केली जात आहे. एकीकडे वैभव पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाबर यांची सतत कोंडी करण्याचे धोरण आखले आहे.
अशा दुहेरी परीक्षेच्या वेळी सुहास बाबर यांनी नव्या समीकरणांचा उदय करण्याकडे वाटचाल केली आहे. त्यांनी थेट आपल्या विरोधकांशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न केला आहे. पडळकर यांचे कट्टर दुष्मण असणाऱ्या जयंत पाटील यांनाच आरतीला बोलवून त्यांनी आपण कशी रणनीती आखू याचे संकेत दिले आहेत. तसेच विशाल पाटील यांच्याही उपस्थितीने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
जयंत पाटील आणि गोपिचंद पडळकर यांच्यात सध्या कलगितुरा रंगला असून पडळकर यांनी पंगा घेतला आहे. त्यामुळे जयंत पाटील पडळकरांच्या गावात जावून दंगा उठवण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत. त्यादृष्टीनेही या भेटीकडे पाहिले जात आहे. सुहास यांनी विशाल पाटील यांना युतीधर्म सोडून मदत केली होती. त्यामुळे विशाल त्याची परतफेड करू शकतात, असेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या गोष्टीची जोरदार चर्चा सुरू असून जिल्ह्याच्या राजकारणात नवी समिकरणे उदयास येणार का याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्र. 1: विट्यातील आरतीला कोणते प्रमुख नेते उपस्थित होते?
उ. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि सुहास बाबर- अमोल बाबर हे उपस्थित होते.
प्र. 2: या उपस्थितीमुळे काय चर्चा सुरू झाली?
उ. विटा आणि खानापूर-आटपाडी मतदारसंघात आगामी निवडणुकांबाबत नवे राजकीय समीकरण चर्चेत आले.
प्र. 3: सुहास बाबर यांनी काय संदेश दिला?
उ. ‘‘आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढणार’’ असा महत्त्वाचा राजकीय संदेश दिला.
प्र. 4: या आरतीचा राजकीय महत्त्व काय?
उ. गणेशोत्सवाचा मंच हा निवडणूकपूर्व राजकीय शक्ती प्रदर्शनाचे ठिकाण ठरला.
प्र. 5: महायुतीसाठी हा इशारा का मानला जातो?
उ. कारण बाबर गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.