Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना नेत्याचा मोठा दावा; ‘राजकारण हे आकड्याचं गणित...शिंदे लवकरच पुन्हा सीएम होतील’

Yuva Sena Leader Kiran Sali Claim : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लाडकी बहीण, युवक कल्याण, एस. टी. बसमध्ये तिकिट सवलत या लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यामुळेच महायुतीचे 232 आमदार निवडून आले आहेत
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Madha, 21 March : एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, असं प्रत्येक शिवसैनिक आणि युवा सैनिकांच्या मनात आहे. शिंदेंच्या चेहऱ्यामुळे महायुतीचे २३२ आमदार निवडून आले आहेत, असं ठणकावून सांगत राजकारण आकड्याचं गणित असतं. आज ना उद्या एकनाथ शिंदे हे नक्की पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं विधान युवा सेनेचे मुख्य सचिव किरण साळी यांनी माढा तालुक्यातील वाकाव येथील युवा सेनेच्या मेळाव्यात केलं.

माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माढा तालुक्यातील वाकाव या गावी युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात साळी बोलत होते. किरण साळी म्हणाले, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लाडकी बहीण, युवक कल्याण, एस. टी. बसमध्ये तिकिट सवलत या लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यामुळेच महायुतीचे २३२ आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील.

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची निवडणूक लढवून विद्यापीठावर भगवा फडकवणार आहोत. युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, युवासेनेचा विस्तार, महाविद्यालयीन युनिट्‌स तयार करणे, हे या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे. 'घर तिथे शिवसैनिक, गाव तेथे शिवसेना' या संकल्पनेद्वारे गावोगावी शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात येणार आहे, असेही किरण साळी (Kiran Sali)यांनी स्पष्ट केले.

साळी म्हणाले, महाराष्ट्रातील नंबर एकची युवा संघटना म्हणून युवा सेना दिसेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी शिवसेना, युवा सेनेत प्रवेश करत आहेत. विरोधकांना धक्का देण्याच तंत्र सुरुच राहील. सोलापूर जिल्ह्यावर एकनाथ शिंदेंचे विशेष लक्ष आहे. सोलापूर जिल्ह्यात युवासेनेचा मोठा झंझावात आहे. युवा संघटन वाढविण्यासाठी युवा संकल्प मेळावे घेतले जात आहेत. काम करणाऱ्यांच्या पाठीमागे एकनाथ शिंदे कायम असतात.

Eknath Shinde
Solapur Bazar Samiti Election: सोलापूर बाजार समितीचा बिगुल वाजणार; 27 एप्रिलला मतदान तर 28 ला मतमोजणी

शिवाजीराव सावंतांसह त्यांचे पुत्र ऋतुराज यांना येत्या काळात लवकरच एकनाथ शिंदे नक्कीच मोठी जबाबदारी देतील. ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रा. तानाजी सावंत यांनी राबविलेल्या आरोग्याची वारी या उपक्रमाचे कौतुक केले. सोलापूर शहर मध्यची जागा आपल्याला मिळाली असती, तर निवडून आली असती असेही त्यांनी नमूद केले.

पृथ्वीराज सावंत यांनी प्रास्ताविकात दौऱ्याचा उद्देश स्पष्ट करत आगामी काळात शिवसेनेचे जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यासाठी संघटना वाढवायची आहे. ताकदीने व जोमाने निवडणुका लढवण्याचा निर्धार केला आहे.

या वेळी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, सुजीत खुर्द, प्रियंका परांडे, सचिन कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, उपप्रमुख बालाजी बागल, शिवसेनेचे माढा तालुकाप्रमुख मुन्ना साठे, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत, नगरसेवक अरविंद खरात आदी उपस्थित होते.

Eknath Shinde
Solapur Crime : बीडच्या आका, खोक्याभाईनंतर सोलापुरात नाईन्ट्या; हवालदाराच्या अंगावर थुंकला, अधिकाऱ्याच्या छातीत मारला ठोसा...

शिवाजी सावंतांना विधान परिषद देण्याची मागणी

शिवाजी सावंत यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेला ताकद मिळत आली आहे. त्यांच्यामुळे शिवसेना जिंवत राहिली आहे. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. सोलापूर शहर मध्यच्या जागेवरचा हक्क सोडला, त्यामुळे सावंत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी. युवासेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी ऋतुराज सावंत यांच्यावरही जबाबदारी देण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. त्यावर किरण साळींनी नक्कीच एकनाथ शिंदेंकडून न्याय मिळवून दिला जाईल, अशी भूमिका मांडली.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com