प्राजक्त तनपुरे म्हणाले, न्यायालयात योग्य तो न्याय मिळेल...

राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्या साखर कारखान्याच्या जमिनी अंंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) तीन दिवसांपूर्वी जप्त केल्या.
prajakt tanpure
prajakt tanpureSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्याचे ऊर्जा व नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्या साखर कारखान्याच्या जमिनी अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) तीन दिवसांपूर्वी जप्त केल्या. या संदर्भात आज प्राजक्त तनपुरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली. ( Prajakt Tanpure said, the court will get the right justice ... )

प्राजक्त तनपुरे म्हणाले, राम गणेश गडकरी साखर कारखाना खरेदी ही नियमांना धरून झाली आहे. राज्यातील मोठ्या वृत्तपत्रात जाहिरात आली होती. ती जाहिरात पाहूनच आम्ही निविदा भरली होती.

prajakt tanpure
कोणाचा कार्यक्रम लावायला गेले आणि त्यांचा कार्यक्रम होऊन गेला

ते पुढे म्हणाले की, नागपूर जिल्ह्यातील बंद पडलेला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात आणून चांगल्या प्रकारे सुरू आहे. या कारखान्यामुळे शेतकऱ्यांना उसाला भाव मिळत आहे. कामगारांना नोकऱ्या मिळाल्या. या कारखान्याच्या व्यवहारा बाबत ईडीने मला बोलावले होते. त्याच वेळेला मी त्यांना समाधानकारक उत्तरे दिली होती.

ईडीने केलेल्या कारवाई संदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की न्यायालयातून आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला आहे.

prajakt tanpure
प्राजक्त तनपुरे म्हणाले, पुन्हा येण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवा

प्राजक्त तनपुरे यांनी चार-पाच दिवसांपूर्वी अहमदनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजप नेते व ईडीवर टीका केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत तनपुरे यांच्या कारखान्याच्या जमिनी जप्त करण्यात आल्या. या प्रकारात स्वतःची बाजू मांडण्यासाठी प्राजक्त तनपुरे पुढे येत नव्हते. त्या ऐवजी काल ( मंगळवारी ) प्रसाद शुगर कारखान्याच्या व्यवस्थापकांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. त्यानंतर आज ( बुधवारी ) प्राजक्त तनपुरे हे स्वतः मुंबईत प्रसारमाध्यमांच्या समोर येत आपली बाजू मांडली.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी राम गणेश गडकरी साखर कारखाना खरेदी बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत ईडीकडे तक्रार केली होती. त्यानुसार तनपुरे यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com